AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangesh Chivte : आज माघार घ्यावी लागली आहे, पण… एकनाथ शिंदेंकडून मंगेश चिवटेंना मोठा शब्द

Mangesh Chivte : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा टि्वस्ट आला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेकडून येथे भाजपविरोधात उमेदवार देण्यात आला होता. महत्वाचं म्हणजे अधिकृत एबी फॉर्मही दिला होता.

Mangesh Chivte : आज माघार घ्यावी लागली आहे, पण... एकनाथ शिंदेंकडून मंगेश चिवटेंना मोठा शब्द
Mangesh Chivte-Eknath Shinde
| Updated on: Oct 09, 2026 | 2:52 PM
Share

मागच्या अनेक दिवसांपासून पुण्याच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा होती. कारण पुण्यातून भाजप आणि शिवसेना दोघांनी आपपाले उमेदवार दिले होते. महायुती म्हणून ते राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका लढवत होते. पण पुण्यात मात्र त्यांनी परस्पराविरोधात उमेदवार दिले होते. आज या निवडणुकीत टि्वस्ट आला. एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आज माघार घेतली. एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर त्यांनी माघार घेतली. “गेली कित्येक वर्ष काम करुन मंगेश चिवटे यांनी आपली ओळख निर्माण केली होती. आरोग्य दूत म्हणून तसंच शिक्षकांचं काम केलं होतं. कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, मंगेश चिवटेंना उमेदवार मिळाली पाहिजे” असं पुणे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर म्हणाले.

“मंगेश चिवटे यांना नक्की न्याय देणार. ते कुठल्या ना कुठल्या रुपात विधानसभेत पोहोचतील. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना शब्द दिला आहे. त्यांच्या आदेशानुसार मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. एक शिवसैनिक म्हणून त्यांनी आदेशाचं पालन केलं आहे” असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं. “मंगेश चिवटे साहेबांनी निवडणूक लढवली असती. पण पक्षाच्या बैठकीत निर्णय झाला. शिंदे साहेबांच्या आदेशानुसार माघार घेतली, नाराजी असतेच. माझ्या सहकाऱ्याने माघार घेतली, याची नाराजी आहे. पक्षाचे प्रमुख आदेश देतात, त्या प्रमाणे माघार घ्यावी लागते. भविष्यात शिंदे साहेब सांगतील त्या प्रमाणे आम्ही प्रचार करणार आहोत. महाराष्ट्रात शिवसेनेला पण काही ठिकाणी जागा दिलेल्या आहेत, त्या तडजोडीमध्ये मग हा निर्णय झालेला आहे” असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं.

भैय्या माने यांची सुद्धा माघार

पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदार संघात महायुतीचा मार्ग मोकळ झालाय. पुणे पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे बंडखोर उमेदवार भैय्या माने यांनी माघार घेतली आहे. शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांनी माघार घेतली आहे. शिक्षक मतदार संघात पुणे भाजपचे कौस्तुभ गावडे आता महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, तर पदवीधर मतदारसंघात स्मिता जाधव या महायुतीच्या उमेदवार असणार आहेत.

Follow Us
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....