AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; खडकवासला साखळीतील धरणांमध्ये 94 टक्के पाणीसाठा

Pune Water Dam | टेमघर धरण परिसरात दोन हजार मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या क्षेत्रात १५०० मिमी पाऊस झाला. तर खडकवासला धरण परिसरात 450 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; खडकवासला साखळीतील धरणांमध्ये 94 टक्के पाणीसाठा
खडकवासला धरण
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 8:14 AM
Share

पुणे: जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पामधील चारही धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे जवळपास 94 टक्के भरली आहेत.

सन 2015 पासून आतापर्यंत जून आणि जुलै या पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांचा विचार केल्यास धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. पुणे जिल्ह्याला शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. टेमघर धरण परिसरात दोन हजार मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणांच्या क्षेत्रात १५०० मिमी पाऊस झाला. तर खडकवासला धरण परिसरात 450 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. त्यानुसार या चारही धरणांच्या परिसरात यंदा आतापर्यंत सरासरी एवढय़ा पावसाची नोंद झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुण्यातील चासकमान धरण 100 टक्के भरले

पुणे जिल्ह्यातील खेड व शिरूर तालुक्यातील शेतीचे नंदनवन करणारे चासकमान धरण हे 100 टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळेच चासकमान धरण पूर्ण भरून वाहायला लागले आहे. चासकमान धरणात पाणी साठवण्याची क्षमता 8.50 टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 25 दिवस आधीच हे धरण भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन धरणाच्या पाचही दरवाजाद्वारे भिमानदी पाञात 925 क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे. तर पॉवर हाऊसमधून 550 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून भीमानदी काठावरच्या नागरीकांना सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्याला मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी मिळणार

पुणे शहराला मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला मंजूर केला आहे. महापालिका हद्दीत नव्याने आलेल्या 23 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी मुळशी धरणामधून 5 टीएमसी पाणी पुणे शहरासाठी द्यावे असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. आता हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल.

पुण्याची लोकसंख्या वाढत असल्याने पाणी कोटा वाढवावा अशी मागणी गेल्या काही वर्षापासून महापालिका करत आहे. महापालिका हद्दीपासून सुमारे 40 किलोमीटर लांब असलेल्या मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाची मान्यता मिळावी यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

हेही वाचा :

जुन्नरमधील पर्यटनस्थळांवर मज्जाव, कलम 144 लागू करुनही पर्यटकांची गर्दी कायम

डॅम इट! भुशी डॅम परिसरात नाकाबंदी, पोलिसांची नजर चुकवत पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी

पावसाळी सहल महागात, पुण्यात कांचन धबधब्यावर गर्दी, पर्यटकांकडून दंडवसुली

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.