Pune Weather | पुण्यात पावसाची उघडीप, आज हलक्या सरी कोसळण्याची शक्यता, सरासरी तापमानातही घट

काल दिवसभर पुणे (Pune) आणि परिसरातल्या नागरिकांनी ऊन-पावसाचा खेळ अनुभवला. काल सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाशासह कडक ऊन पडलेलं असताना अचानक काही भागांमध्ये पावसाच्या सरी (Rain in Pune) कोसळल्या. त्यामुळे दिवसाच्या सरासरी तापमानात काहीशी घट झाल्याचं पाहालया मिळालं.

Pune Weather | पुण्यात पावसाची उघडीप, आज हलक्या सरी कोसळण्याची शक्यता, सरासरी तापमानातही घट
प्रातिनिधीक फोटो

पुणे : काल दिवसभर पुणे (Pune) आणि परिसरातल्या नागरिकांनी ऊन-पावसाचा खेळ अनुभवला. काल सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाशासह कडक ऊन पडलेलं असताना अचानक काही भागांमध्ये पावसाच्या सरी (Rain in Pune) कोसळल्या. त्यामुळे दिवसाच्या सरासरी तापमानात काहीशी घट झाल्याचं पाहालया मिळालं. काल संध्याकाळी शिवाजीनगर वेधशाळेत 0.7 मिलीमीटर तर लोहगाव वेधशाळेतही 0.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. (The meteorological department has forecast light showers with cloudy skies in and around Pune today)

आजही हलक्या सरी कोसळण्याची शक्यता

आज पुणे शहर आणि परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शहरात पावसाच्या सरी पडल्याने 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला कमाल तापमानाचा पारा काल 29.6 अंशापर्यंत कमी झाला होता. तर किमान तापमानाचा पारा हा 20.8 अंशांपर्यंत खाली आला होता.

दिवसाचं सरासरी तापमान हे 30 अंश सेल्सिअस

आज दिवसाचं सरासरी तापमान हे 30 अंश सेल्सिअस असणार आहे तर रात्रीचं सरासरी तापमान 26 अंश सेल्सिअस असणार आहे. दिवसा आणि रात्री आकाश सामान्यतः ढगाळ असेल. दिवसा वाऱ्याचा वेग 41 किमी प्रतितास तर रात्री 30 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. दिवसा दुपारनंतर पावसाची एक सर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शहर आणि परिसरात पावसाची उघडीप

गेल्या आठवड्यापासून पुणे शहर आणि परिसरात पावसाची उघडीप पहायला मिळत आहे. श्रावण सुरू झाल्यापासून शहरात ढगाळ वातावरण आहे. त्यात कधी कुठल्या भागात हलका पाऊस पडून जातो तर कधी आकाश स्वच्छ होऊन अचानक कडक ऊन पडतं. काल सकाळपासून शहरात आभाळ दाटून आलं होतं. त्यानंतर काही भागात हलका पाऊस झाला. त्यानंतर दुपारी सूर्यप्रकाश पडला.

पावसाचा पाठशिवणीचा खेळ!

जून महिन्याच्या सुरूवातीला पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर पुण्यात पावसाने सतत हुलकावणी दिली आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस बरसल्याने मॉन्सूनने जून महिन्याची सरासरी ओलांडली होती. त्यानंतर अर्धा जुलै महिना ओलांडला तरी शहरात पावसाचा पत्ता नव्हता.

त्यानंतर पुन्हा जुलैच्या महिन्याच्या अखेरीस शहरात 193 मिमी पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. 25 ऑगस्टपर्यंत पुण्यात 38.4 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा तब्बल 70 मिमीपेक्षा कमी आहे. गेल्या 10 वर्षांत ऑगस्ट महिन्यात पुण्यात पडलेल्या पावसाची तुलना केली तर यंदा सर्वात कमी पाऊस पडलेलं हे दुसरं वर्ष आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांची कृतज्ञता, पुण्यात बैलाच्या मृत्यूनंतर माणसाप्रमाणे दशक्रिया विधी तेरावा

49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 85600 कोटी रुपये पोहोचले, तुमच्या खात्यावर आले?, सरकारकडून महत्त्वाची माहिती

पुण्यात दोघांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला, सात जणांचं फरार टोळकं अखेर जेरबंद

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI