Pune News | सर्वात मोठं आर्थिक, मानसिक शोषण, 3 महिने मेहनत पण हातात पावतीसह टेकवले 66 रुपये

पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण गावातील नाना तिवटे हे शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये 11 गुंठ्यांमध्ये वांग्याचे पीक लावले होते. मात्र बाजारभावामुळे चांगले पीक असूनही ते आता कवडीमोल दराने विक्री झाली आहे.

Pune News | सर्वात मोठं आर्थिक, मानसिक शोषण, 3 महिने मेहनत पण हातात पावतीसह टेकवले 66 रुपये
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 11:45 PM

पुणे : नकळत आर्थिक आणि मानसिक शोषण कसं असतं, याचं वाईट उदाहरणसमोर आलं आहे. या क्षेत्रात सेवा देताना आपण नकळत गुलामगिरीच करतो अशी भावना कुणाच्याही मनात येईल. कारण ३ महिने काम करुन फक्त ६६ रुपये हातात येतात, पण लवकर न कळणारी आणि फार उशीरा समोर येणारी ही एक गुलामीच आहे. कदाचित ही बातमी वाचल्यानंतर फेसबूक किंवा व्हॉटसअपवर सर्वात जास्त शेअर केली जाईल. पण या क्षेत्राला लवकर न्याय मिळाला नाही, तर या क्षेत्रातील संबंधित लोकांच्या पिढ्यांनपिढ्या फक्त मेहनत करुन संपून जातील आणि पुढील पिढ्या प्रत्यक्ष गुलामीच्या झळांनी होरपळून निघतील.

यापेक्षा रोजगार हमी योजनेचं काम परवडतं

रोजगार हमी योजनेत देखील दिवसाला २५६ रुपये रोजाने वर्षातील शंभर दिवस काम मिळतं. जरी तो व्यक्ती ९० दिवस रोजगार हमी योजनेत कामावर गेला असता, तरी त्याच्या हातात २३ हजार ४० रुपये लागले असते, नवरा बायको या दोघांनी काम केलं असतं तर ४६ हजार ८० रुपये मिळाले असते. विचार करा हे क्षेत्र असं आहे की, या क्षेत्रात ते फक्त सेवा देतात, पण त्यांना काय पण त्यांच्या मुला बाळांच्या हातातही काही लागत नाही. देशात या क्षेत्राला सर्वात वाईट दिवस आहेत, म्हणून हा क्षेत्रात काम तरी का करायचं हा देखील प्रश्न आहे.

वांग्याचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीकच काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याला 100 किलो वांग्याला फक्त 66 रुपये मिळाल्याचे समोर आले आहे. पुण्यातल्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये हा प्रकार घडला आहे. तिथेच वांग्याची विक्री करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतातील वांग्याचे पीकच उपटून टाकले आहे. शेतीमाल कवडीमोलाने विकला जात असल्याने आता शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण गावातील नाना तिवटे हे शेतकरी आहेत. त्यांनी त्यांच्या शेतामध्ये 11 गुंठ्यांमध्ये वांग्याचे पीक लावले होते. वांग्याला चांगला बाजारभाव मिळेल या हेतूने त्यांनी चांगली खतं आणि औषधं वापरून पीकही चांगल्या पद्धतीने काढले होते.

या 11 गुंठ्यांमध्ये पीकदेखील चांगलेच आले होते. त्यामुळे 100 किलो वांग्याचे पीक आले, त्यामुळे ते विक्रीसाठी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे आणण्यात आले होते. मात्र त्या पिकाला योग्य बाजारभावच मिळाला नाही. तीन महिने मेहनत करून 100 किलो वांग्याना फक्त 66 रुपये मिळाले आहेत.

त्यामुळे शेतकरीवर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पिकाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रागाच्या भरात या पिकवलेल्या वांग्याचे पीक स्वतः हून उपटून टाकण्यात आले आहे.

तिवटे यांनी काढलेल्या वांग्याच्या उत्पादनाच्या काढणीचाही खर्च या पैशातून निघणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या परिसरातील अनेक वांगी उत्पादक शेतकऱ्यांनी सांगा आम्ही जगायचं कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.