Rain : हवामान विभागाने आज कुठे दिला रेड अलर्ट, राज्यात सर्वत्र पाऊस

Rain News : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा जोरा कायम आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. शनिवारी हवामान विभागाने काही ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे.

Rain : हवामान विभागाने आज कुठे दिला रेड अलर्ट, राज्यात सर्वत्र पाऊस
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 8:16 AM

पुणे | 22 जुलै 2023 : राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. शनिवारी हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अन् यलो अलर्ट दिला आहे. पावसामुळे काही ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक धरणांमध्ये जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ७८ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

आज कुठे रेड अलर्ट

पुणे हवामान विभागाने आज पुन्हा रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर, सातारा, ठाणे पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच मुंबई, रत्नागिरी, जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. २३ जुलै रोजी पुणे आणि पालघर जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे.

चंद्रपुरात शाळांना सुट्टी

चंद्रपूर जिल्ह्यास हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. चंद्रपुरात जिल्ह्यातील सर्वच नद्याच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठया अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी 11 दरवाजे आज सकाळी 5 वाजता उघडले आहे. अप्पर वर्धा धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक चांगली होत आहे. अमरावतीमधील अप्पर वर्धा धरण 73 टक्के भरले आहे. सध्या या धरणातून 1335 घन मीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत पाऊस कायम

मुंबई उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. कल्याण डोंबिवलीत सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. सखल भागात अन् रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कल्याणमधील टिळक चौक रस्त्यावर गुढघाभर पाणी साचले आहे. यामुळे वाहन चालकांना कसरत करत पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंग चहल यांनी मुंबईमध्ये जोरदार पावसानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला

नांदेडमध्ये अतिवृष्टीची नोंद

नांदेडमध्ये गेल्या चोवीस तासांपासून सातत्याने पाऊस बरसत आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक जागी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली बुडाली आहेत. आधी लांबलेला पाऊस आणि आता सातत्याने अतिवृष्टी होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलीय आहे.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.