राज ठाकरे यांची मनसे लोकसभेच्या किती जागा लढवणार, त्या अहवालातील ‘राज’

lok sabha election and raj thackeray | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरु आहे. या पाच राज्यातील विधानसभा म्हणजे लोकसभेची सेमीफायनल म्हटली जात आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेच्या तयारीस लागली आहे. त्यासाठी विविध मतदार संघाचे अहवाल आले आहे.

राज ठाकरे यांची मनसे लोकसभेच्या किती जागा लढवणार, त्या अहवालातील 'राज'
Raj Thackray
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 11:58 AM

प्रदीप कापसे, पुणे, दि. 21 नोव्हेंबर | मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छतीसगड, मिझोरम या राज्याच्या विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. तीन डिसेंबर रोजी निकाल येणार आहे. ही निवडणूक म्हणजे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेची सेमीफायनल म्हटली जात आहे. भाजप, काँग्रेस आणि दोन्ही पक्षांच्या आघाडीत असलेले विविध पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. महाराष्ट्रात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या कामाला लागली आहे. या निवडणुकीत मनसे किती जागा लढवणार आहे? यासंदर्भात रणनीती तयार करण्यासाठी एक अहवाल तयार करण्यात आला आहे. तो अहवाल राज ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांची राज ठाकरे उद्या बैठक घेणार आहेत.

२० लोकसभा मतदारसंघाचे अहवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लागले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे पुणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवणार आहे. यासाठी त्यांनी दोन ते तीन दौरे पुण्याचे केले आहेत. तसेच अमित ठाकरे यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. राज्यात मनसेने पाहणी करुन एक अहवाल तयार केला आहे. राज्यातील २० लोकसभा मतदारसंघाचा हा अहवाल आहे. हा अहवाल राज ठाकरे यांना सादर करण्यात आला आहे. मनसेने लोकसभा निवडणूक लढवावी, अनेक भागांत पक्षाला चांगला प्रतिसाद असल्याचे मत निरीक्षकांनी या अहवाल व्यक्त केले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीचा चेंडू आता राज ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे घेणार बुधवारी बैठक

लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात राज ठाकरे बुधवार २२ नोव्हेंबर रोजी बैठक घेणार आहे. लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांची राज ठाकरे बैठक घेणार आहे. या बैठकीला सकाळी ९ वाजेपासून सुरुवात होणार आहे. दोन दिवसांत आढावा घेवून राज ठाकरे लोकसभा निवडणुकीची रणनीती आखणार आहे. या बैठकीत मतदार संघातील संभाव्य उमेदवार, त्यांना अनुकूल असणारे वातावरण यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. यामुळे मनसे कार्यकर्त्यांचे बैठकीकडे लक्ष लागले आहे.

Non Stop LIVE Update
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?
...तर हे बाबासाहेबांना अभिवादन राहिलं असतं, सुजात आंबेडकरांची खंत काय?.