Raj Thackeray: राज ठाकरे पुण्यात येणार, पण बैठकांचं काय? आज की उद्या?

Raj Thackeray: राज ठाकरे पुण्यात येणार, पण बैठकांचं काय? आज की उद्या?
मनसे प्रमुख राज ठाकरे
Image Credit source: TV9

राज ठाकरेंच्या या पुणे दौऱ्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेले मनसे नेते वसंत मोरेंचे नाराजी नाट्यदूर होणार का? अश्या चर्चाही रंगल्या आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात वंसत मोरे उद्या राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. राज यांच्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याविरोधात भूमिका घेतल्यानं वंसत मोरे चर्चेत आले होते.

प्रदीप कापसे

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

May 17, 2022 | 11:18 AM

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरें ((Raj Thackeray) पुणे दौरा आजपासून सुरु होत आहे. ‘शिवतीर्थ’ वरून राजा ठाकरे पुण्यासाठी रवाना झाले आहे. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठका नेमक्या कधी होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसोबत आज व उद्या बैठका होणार आहेत हे कळू शकलेले नाही . अयोध्या दौऱ्याला(Ayodhya Tour) जाण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी तसेच अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्याच्या नाव नोंदणी मोहिमेचा उदघाटन समारंभासाठी राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी पुण्यातील(Pune ) मनसे पदाधिकाऱ्यांच्याकडून करण्यात आली आहे अयोध्येच्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे हे पुण्यात सभा घेण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.यासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगीही मागण्यात आली आहे.

मनसे नेते वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

राज ठाकरेंच्या या पुणे दौऱ्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेले मनसे नेते वसंत मोरेंचे नाराजी नाट्यदूर होणार का? अश्या चर्चाही रंगल्या आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात वंसत मोरे उद्या राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. राज यांच्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याविरोधात भूमिका घेतल्यानं वंसत मोरे चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी स्वतः राज ठाकरे यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र त्यानंतर स्थानिक मनसेनेते व वसंत मोरे याच्यामध्ये निर्माण झालेली विसंवादाची दरी अद्यापही मिटलेली दिसत नाही. स्थानिक नेत्यांकडून आपलयाला सतत डावलण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही वंसत मोरे यांनी केली होती. याबरोबर आपली नाराजीही त्यांनी अनेकदा व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंची आणि वसंत मोरेंची होणार भेट

राज ठाकरे पुणे दौऱ्यात वसंत मोरेंची नाराजी दूर करणार का? याकडंही सर्वांचे लक्ष लागले आहे. भोंग्याच्या विरोधातील भूमिका घेतल्यानंतर मनसे नेते वंसत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले होते. त्याठिकाणी साईनाथ बाबर यांची नवे शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वंसत मोरे यांनी शिवतीर्थवर जाऊन राज यांची भेट घेतली होती. त्या भेटीवेळी तुला निवांत वेळ देतो असं सांगितलं होतं. त्यांनुसार उद्या राज ठाकरेंची आणि वसंत मोरेंची होणार भेट असल्याचे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें