रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला अखेर स्थगिती, विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला मोठे यश

पुण्यातील ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटच्या (Ranade Institute) स्थलांतराला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे.

रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला अखेर स्थगिती, विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला मोठे यश
रानडे इन्स्टिट्यूट, पुणे

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटच्या (Ranade Institute) स्थलांतराला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर तसेच विद्यार्थ्यांकडून सेव्ह रानडे इन्स्टिट्यूट ही मोहिम राबवण्यात आल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (Ranade Institute relocation Postponement)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडीज आणि डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या दोन विभागांचे विलीनीकरण केले आहे. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, जर्नलिझम अँड मीडिया स्टडीज असा नवीन विभाग प्रस्तावित केला आहे. या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन विभागांच्या विलीनीकरण करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध होत आहे. यासाठी सेव्ह रानडे इन्स्टिट्यूट नावाची मोहीम देखील चालवली गेली होती. यानंतर अखेर रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला स्थगिती देण्यात आली आहे.

पत्रकारितेच्या शिक्षण क्षेत्रात राज्यभरात नाव असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा वाद गेल्या काही दिवसांपासून रंगत होता. पुण्याच्या डेक्कन परिसरात असणाऱ्या या इन्स्टिट्यूटचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात स्थलांतरित करण्यात येणार होतं. मात्र, या स्थलांतरावरुन रानडे इन्स्टिट्यूटचं महत्व कमी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांनी केला होता. रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर करण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोपही इन्स्टिट्यूट बचाव कृती समितीनं केला होता. परंतु आता इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला स्थगिती देण्यात आली असल्याने हा वाद थांबेल असं बोललं जात आहे.

इतर बातम्या

हवं तर पवारांना विचारा, आणखी दोन वर्ष लहान मुलांना ऑनलाईनच शिकू द्या, का म्हणतायत सीरमचे पुनावाला?

पुण्यात महाविकासआघाडीचा भाजपला ‘दे धक्का’, महानगरपालिका निवडणुकीत भाजप बहुमतापासून दूर राहणार?

(Ranade Institute relocation Postponement)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI