AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराला आजी-माजी विद्यार्थ्यांचा मोठा विरोध, 15 दिवसांत निर्णय घेण्याचे कुलगुरूंचे आश्वासन

डेक्कन परिसरात असणारं हे इन्स्टिट्यूट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. मात्र, या स्थलांतरावरुन रानडे इन्स्टिट्यूटचं महत्व कमी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांनी केलाय.

रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराला आजी-माजी विद्यार्थ्यांचा मोठा विरोध, 15 दिवसांत निर्णय घेण्याचे कुलगुरूंचे आश्वासन
रानडे इन्स्टिट्यूट, पुणे
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 3:02 PM
Share

पुणे : पत्रकारितेच्या शिक्षण क्षेत्रात राज्यभरात नाव असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा वाद चांगलाच रंगला आहे. डेक्कन परिसरात असणारं हे इन्स्टिट्यूट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. मात्र, या स्थलांतरावरुन रानडे इन्स्टिट्यूटचं महत्व कमी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांनी केलाय. रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर करण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप इन्स्टिट्यूट बचाव कृती समितीनं केला आहे. (Students strongly oppose to taking Ranade Institute in University campus)

रानडे इन्स्टिट्यूट हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलाय. त्याला आता मोठा विरोध होत आहे. रानडे इन्स्टिट्यूटचे स्थलांतर करून त्याच्या जागेवर काही लोकांचा डोळा असल्याचा आरोप केला जातोय. ही जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. या जागेची किंमत साधारण 400 कोटी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे रानडे इन्स्टिट्यूटचे स्थलांतर केलं तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी कृती समितीने दिलाय. दरम्यान 15 दिवसात यासंदर्भात अभ्यास करून निर्णय घेऊ असं आश्वासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिले.

ड्रोन तंत्रज्ञानाचे नव्याने सुरु झालेले अभ्यासक्रम

प्रमाणपत्र अभ्यासक्रम

इंट्रोडक्शन टू ड्रोन टेक्नॉलॉजी (कालावधी – 2 आठवडे ) अड्वान्स कोर्स ऑन ड्रोन टेक्नॉलॉजी (कालावधी 12 आठवडे ) ड्रोन पायलट ट्रेनिंग कोर्स (एक ते दोन आठवडे)

पदवी अभ्यासक्रम

बॅचलर ऑफ ऑटोनॉमस व्हेईकल (कालावधी तीन वर्षे)

पदव्युत्तर पदवी

मास्टर ऑफ ऑटोनॉमस व्हेईकल (कालावधी दोन वर्षे)

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती कुठे मिळणार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रमांबाबत वेबसाईटवर प्रवेश परीक्षेसंदर्भात अधिक माहिती उलब्ध होईल. इच्छूक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट देऊन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती मिळवावी.

इतर बातम्या :

Pune unlock: पुणे शहर अनलॉक होतंय, पण ग्रामीणचं काय होणार?; अजित पवारांनी सांगितलं काय सुरू, काय बंद?

मोठी बातमी, उद्यापासून पुणे अनलॉक, व्यापाऱ्यांच्या दबावापुढे सरकारचा मोठा निर्णय, वाचा काय सुरु, काय बंद?

Students strongly oppose to taking Ranade Institute in University campus

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.