हवं तर पवारांना विचारा, आणखी दोन वर्ष लहान मुलांना ऑनलाईनच शिकू द्या, का म्हणतायत सीरमचे पुनावाला?

मी कधी कॉलेजमध्ये जात नव्हतो. पवार साहेब मला हसायचे. हा कँटीनमध्येच भेटेल हे त्यांना माहीत असायचं. मी वर्गात जात नव्हतो. तरीही मी सीरम इन्स्टिट्यूट बांधली. हवं तर शरद पवारांना विचारा, असंही त्यांनी अधोरेखित केलं. 

हवं तर पवारांना विचारा, आणखी दोन वर्ष लहान मुलांना ऑनलाईनच शिकू द्या, का म्हणतायत सीरमचे पुनावाला?
Cyrus Poonawala, sharad pawar
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 3:52 PM

पुणे : काही देश हळूहळू सर्व काही शिथिल करत आहेत. शाळा सुरू करत आहेत. त्यांचा परिणाम बघून आपण पुढे जायला हवं, असंही सीरम इन्स्टिट्युटचे संस्थापक सायरस पुनावाला म्हणालेत. ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांना मानाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला असून, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने आज हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. त्यावेळी सायरस पुनावाला बोलत होते.

तेव्हा कँटीनमध्ये पवारसाहेब भेटल्यावर मला हसत होते

विविध देशात शाळा सुरू करत आहेत. त्याचा काय परिणाम आहे. ते पाहून आपण पुढे गेलं पाहिजे. एक दोन वर्षे शाळा नाही सुरू झाल्या तरी आपण घरीच अभ्यास करू शकतो. मी कधी कॉलेजमध्ये जात नव्हतो. पवार साहेब मला हसायचे. हा कँटीनमध्येच भेटेल हे त्यांना माहीत असायचं. मी वर्गात जात नव्हतो. तरीही मी सीरम इन्स्टिट्यूट बांधली. हवं तर शरद पवारांना विचारा, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.

नोवोवॅक्स ही लस 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना देऊ शकतो

नोवोवॅक्स ही लस 12 वर्षांपर्यंतच्या मुलांना देऊ शकतो. त्याची ट्रायल सुरू आहे. त्याची ट्रायल संपली की आम्ही ती देऊ शकतो. अमेरिकेत काही परवानग्या बाकी आहे. त्यामुळे लगेच लहान मुलांना लस मिळणार नाही. कोव्हिशिल्डची टेस्टिंग केली, तेव्हा 18 वर्षांखालील मुलांना द्यायला परवानगी मिळालेली नाही. तसेच आम्ही परवानगी घेणारही नाही. कारण ते धोकादायक आहे. कोणावर काही रिअॅक्शन झालं आणि कोण मेले तर त्याची जबाबदारी कोण घेणार, मी तर घेणार नाही, असंही सायरस पुनावालांनी सांगितलंय.

दोन लसींमध्ये दोन महिन्यांचं अंतर योग्य

मोदी सरकानं एक्स्पोर्ट बंद केली हे खूप वाईट झालं. मात्र, यावर बोलू नका असं मला मुलानं सांगितलं असल्याचं सायरस पुनावाला म्हणाले. अमेरिकेत आताही अनेकांना लागण होत आहे. कोरोना जाणार नाही. दोन लसींमध्ये दोन महिन्यांचं अंतर योग्य आहे. पण मोदी सरकारला लस मिळाली नाही म्हणून त्यांनी दोन डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर ठेवण्यास सांगितलं आहे. आम्हाला नफ्यात खूप नुकसान सहन करावं लागलं. सर्वांची अपेक्षा आहे की आम्हाला लस मिळावी पण ते शक्य नाही. मी लस विकून पैसे कमवायला बसलेलो नाही पण लोकांनी लस घ्यावी, असं आवाहनही सायरस पुनावाला यांनी केलंय.

निष्काळजीपणामुळेच जास्त मृत्यू झाल्याचा आरोप

निष्काळजीपणामुळे लोकांचे मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे, असा गंभीर आरोपही सायरस पुनावाला यांनी केलाय. तसंच दोन लसी एकत्र करण्यास आपला विरोध आहे. 6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव कमी होत आहे. तिसरा डोस किंवा बुस्टर डोस घेतला पाहिजे. तिसरी लाट जास्त गंभीर नसेल, असंही सायरस पुनावाला यांनी म्हटलंय.

इतर बातम्या :

विनावर्दी कारवाई नको, साध्या वेशात तर नाहीच नाही, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश

हवाई प्रवास आजपासून महागला, सरकारने देशांतर्गत उड्डाणांचे भाडे 13 टक्क्यांनी वाढवले ​

Well ask to sharad Pawar, let the children learn online for two more years, why is it called Cyrus Poonawala of Serum?

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.