Lumpy skin disease : मावळमधल्या उर्सेत लम्पीचा वेगानं प्रसार, लसीकरणाला सुरुवात

लम्पी हा गाय-म्हशींमधील एक रोग आहे. हा LSD नावाचा विषाणू आहे, जो डास, माशा आणि गोचिडांद्वारे पसरतो. याशिवाय दुषित पाणी, लाळ आणि चाऱ्यातूनही याचा प्रसार होतो.

Lumpy skin disease : मावळमधल्या उर्सेत लम्पीचा वेगानं प्रसार, लसीकरणाला सुरुवात
लम्पी लसीकरण, मावळ
Image Credit source: tv9
रणजीत जाधव

| Edited By: प्रदीप गरड

Sep 12, 2022 | 10:59 AM

मावळ, पुणे : मावळमधील उर्से गावातील वीस जनावरांना लम्पी विषाणूची लागण (Lumpy skin disease) झाली आहे. या विषाणूचा बाह्य कीटकांद्वारे प्रसार होतो. त्यामुळे शासन नियमानुसार परिसरातील जनावरांच्या लसीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या विषाणूची लागण झाल्याने जनावरांना ताप येऊन दूध उत्पादन घटण्याची शक्यता असते. जनावरे चाराह खात नाहीत. अशा जनावरांना तापाची औषध देणे आणि लसीकरण करणे आवश्यक आहे. मावळमध्ये (Maval) जवळपास 52 हजार पशुधन आहे. गाय, बैल यांचे 25 पंचवीस हजार तर म्हैस वर्गातील 26 हजार पशुधन आहे. उर्से गावात या रोगाची जास्त प्रमाणात लागण झाली आहे. दरम्यान, जनावरांचे लसीकरण (Vaccination) केल्यानंतर आता पंधरा ते वीस दिवसांत या जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

बळीराजावर पुन्हा मोठे संकट

जनावरांमधील लम्पी नावाच्या रोगाने राज्यात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बळीराजावर पुन्हा मोठे संकट ओढावले आहे. लम्पी हा गाय-म्हशींमधील एक रोग आहे. हा LSD नावाचा विषाणू आहे, जो डास, माशा आणि गोचिडांद्वारे पसरतो. याशिवाय दुषित पाणी, लाळ आणि चाऱ्यातूनही याचा प्रसार होतो.

जनावरांच्या शरीरावर गाठी

या आजारात जनावरांच्या शरीरावर गाठी तयार होतात. या गाठी हळूहळू मोठ्या होतात. त्याच्या जखमा तयार होतात. जनावरांना ताप येतो, गाय-म्हशी दूध देणे बंद करतात. गर्भवती जनावरांचा गर्भपात होतो. या रोगात जनावरांचा मृत्यूही होतो.

माणसाला प्रसार नाही

लम्पी हा जनावरांमध्ये होणार आजार आहे. अजूनपर्यंत तरी माणसांमध्ये याचे संक्रमण झाल्याचे कुठलेही प्रकरण नाही. मात्र तरी आजारग्रस्त जनावरांची स्वच्छता केल्यानंतर संबंधित ठिकाण निर्जंतुकाने स्वच्छ करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

देशभरात 57 हजार जनावरे दगावली

देशभरात सध्या लम्पी स्कीन या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये वाढत आहे. या आजारामुळे 57 हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वाधिक जनावरे ही राजस्थानात दगावली गेली आहेत. महाराष्ट्रात 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने याचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणचे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश पशूसंवर्धन विभागाने दिले आहेत

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें