ठाकरे गटाचे या चिमण्यांनो परत फिरारे? नारायणगावच्या सभेतून संजय राऊत यांची हाक काय?; मोठ्या घडामोडी घडणार?
Sanjay Raut Big Appeal : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजत असताना खासदार संजय राऊत यांनी मोठे आव्हान केले आहे. ते सध्या पुणे दौऱ्यावर आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटाने आतापासूनच कंबर कसल्याचे दिसून येते.

स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल कधी वाजेल सांगता येत नाही. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येकाची तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी अजून साटंलोटं ठरलेले नाही. या निवडणुका स्वतंत्र लढणार की आहे त्या आघाड्या, युतीचा धर्म पाळणार हे स्पष्ट नाही. त्यातच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मुंबई, मराठी माणसाचा राग अगोदरपासूनच आळवला आहे. मनसेसोबतची युतीची चर्चा असो की मराठी मतदारांना आव्हान असो, त्याचे प्रयोग सुरू आहेत. आज पुण्यात आल्यावर खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
शिवसेनेचा झेंडा मुंबईत नाही फडकला तर कसे होईल?
नारायणगाव येथे खासदार संजय राऊत यांनी पदाधिकारी मेळाव्यात मोठे वक्तव्य केले. त्यांनी मुंबईत मराठी माणसाचा आवाज टिकवायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याचे ठासून सांगितले. इथे कष्टकऱ्यांची ताकद फार मोठी आहे मुंबईत जाऊन पहा या भागातला माणूस कष्ट करत आहे. मार्केटला जा सकाळपासून तुम्हाला याच भागातला माणूस कष्ट करताना दिसेल संघर्ष करताना दिसेल, असे ते म्हणाले.
मुंबईमध्ये मराठी माणसाचा अस्तित्व असेल तर जुन्नर, मंचर फुलाच्या मार्केटमध्ये मराठी आवाज ऐकायला येतोय. भायखळाच्या बाजारात मराठी माणूस, नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठी माणूस आहे. मुंबई मध्ये मराठी पण टिकवण्याचा काम या भागातील लोकांनी केलेले आहे. मुंबई आपल्या हातात ठेवण्याचे आणि शिवसेनेचा झेंडा मुंबईत नाही फडकला तर कसे होईल? असा रोकडा सवाल त्यांनी केला. पक्ष आपला उभा राहिला पाहिजे विखुरलेली माणसे गोळा करण्याचा काम करा, असे आव्हान त्यांनी यावेळी केले. त्यांनी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी मुंबईबाहेरील वर्तुळात काम करण्यास सुरूवात केल्याचे दिसून येते.
शरद पवार, उद्धव ठाकरे खरे नेते
अजित पवार एकनाथ शिंदे हे नेते नाहीत तर शरद पवार, उद्धव ठाकरे हे खरे नेते आहेत, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा हे आहेत आणि अजित पवार च्या पक्षाच्या प्रमुख सुद्धा अमित शहा आहेत, असे ते म्हणाले. हे पक्ष दिल्लीत बसून अमित शहा चालवतात. तो व्यापारी माणूस आहे. त्याला मुंबई गिळायची. त्याला मुंबईची धन आणि दौलत हवी आहे, असा आरोप राऊतांनी केला. त्यासाठी सगळ्यात आधी त्याला इकडल्या मराठी माणसाला कष्ट करणाऱ्यांना खत्म करावा लागेल, असे ते म्हणाले.
स्वाभिमानाचा विषय जनतेत न्या
हा मराठी माणूस त्याच्या अंगावर जाईल म्हणून त्याने शिवसेना फोडली. म्हणून त्याने शरद पवारांच्या पक्ष फोडला आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे पक्ष होते. हे आपण लोकांपर्यंत हा विचार विषय नेला पाहिजे. शिवसेनेचा तिथे मराठी माणूस आहे मत देतो. आपल्याला मराठी माणूस अजूनही मराठी माणसाच्या मनामध्ये आपल्याविषयी किलमिश नाही. तो आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनाच मत देणार तो त्याचे उपकार विसर नाही, असे राऊत म्हणाले.
आपली ताकद दाखवायची आहे
आपल्याला जिंकायचे आहेत आणि आपली ताकद दाखवायचे आहे त्याच्यामध्ये जुन्नरचा पहिला क्रमांक असेल. जिल्हा परिषदांपासून विधानसभेपर्यंत 2029 आपल्या जुन्नर मधली प्रत्येक निवडणूक लढण्याच्या आहे. अजित पवार यांना काय सोनं लागला आहे का? असा सवाल राऊतांनी केला.
