Sambhaji Chhatrapati : गरीब मराठा समाजातील मुलांनाही आरक्षण मिळायला हवं, संभाजीराजे छत्रपतींची सरकारकडून अपेक्षा

दहीहंडी जगात काही ठिकाणी खेळला जाणार प्रकार आहे. मात्र मुंबई, पुणे, ठाणे या परिसरात तो जास्त खेळला जातो. त्याला साहसी खेळाचा दर्जा देत असतील तर चांगलेच आहे, असे संभाजी छत्रपती म्हणाले.

Sambhaji Chhatrapati : गरीब मराठा समाजातील मुलांनाही आरक्षण मिळायला हवं, संभाजीराजे छत्रपतींची सरकारकडून अपेक्षा
एका कार्यक्रमादरम्यान संभाजीराजे छत्रपतीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 12:27 PM

पुणे : दहीहंडीचा (Dahihandi) क्रीडा प्रकारात समावेश होत असेल तर चांगली बाब आहे. दहीहंडी खेळाडूंना आरक्षण मिळत असेल तर तेही चांगलेच. मात्र गरीब मराठा समाजातील मुलांनादेखील आरक्षण मिळायला पाहिजे. ही बाब ध्यानात ठेवावी, अशी अपेक्षा संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच गोविंदांच्या आरक्षणाचा निर्णय जाहीर केला होता. त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. कुणी स्वातग करत आहे, तर कुणी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका करत आहे. संभाजीराजे यांनीही या मुद्द्यावर आपले मत व्यक्त केले. गोविंदांना आरक्षण (Reservation) मिळत असेल तर त्याचे स्वागत आहे, मात्र गरीब मराठा समाजातील मुलांचाही विचार करण्यात यावा, असे ते म्हणाले.

‘स्वराज्य संघटना अशा सगळ्या घटकांच्या पाठीशी’

दहीहंडी जगात काही ठिकाणी खेळला जाणार प्रकार आहे. मात्र मुंबई, पुणे, ठाणे या परिसरात तो जास्त खेळला जातो. त्याला साहसी खेळाचा दर्जा देत असतील तर चांगलेच आहे, असे ते म्हणाले. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाशी संबंधित प्रश्नांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे सोमवारी मुंबईत मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर ते म्हणाले, की तो त्यांचा अधिकार आहे. स्वराज्य संघटना अशा सगळ्या घटकांच्या पाठीशी आहे. मात्र या मोर्चात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

‘तो त्यांचा अधिकार’

देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजाचे मुख्यमंत्री होते. आता ते सर्व समाजाचे उपमुख्यमंत्री आहेत. ते विशिष्ट समाजाचे म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही. त्यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली आहे. तो त्यांचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. कालच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली होती. नरेंद्र मोदींनंतरच्या दोन-तीन पर्यायांमध्ये फडणवीस असू शकतात. त्यांना ब्राह्मण महासंघ सहकार्य करेल, असे गोविंद कुलकर्णी काल म्हणाले होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.