राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंचा वारू उधळला, आम्हीही बांगड्या भरल्या नाहीत; राऊतांचा इशारा

राज्यात तिन्ही पक्षात उत्तम समन्वय आहे. आघाडीत जराही मतभेद नाहीत. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटलांसारखे काही लोक कुरबुरी करत आहेत. (sanjay raut slams ncp mla dilip mohite patil)

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंचा वारू उधळला, आम्हीही बांगड्या भरल्या नाहीत; राऊतांचा इशारा
sanjay raut

खेड: राज्यात तिन्ही पक्षात उत्तम समन्वय आहे. आघाडीत जराही मतभेद नाहीत. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटलांसारखे काही लोक कुरबुरी करत आहेत. मोहिते-पाटलांचा वारू उधळला आहे. पण आम्हीही बांगड्या भरल्या नाहीत. आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही काय करू शकतो हे दाखवून देऊ, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. (sanjay raut slams ncp mla dilip mohite patil)

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्यानंतर पोखरकरांविरोधात बंड करणारे काही सदस्य सहलीवर गेले आहेत. या सदस्यांना राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांची फूस असल्याने शिवसेना संतप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीला थेट इशारा दिला. जे गेलेत किंवा पळवून नेलेत त्यांचा बंदोबस्त आम्ही करू. विद्यमान आमदार आहेत, त्यांचा वारू नेहमीच उधळलेला असतो. पण शिवसेनेने बांगड्या भरलेल्या नाहीत. आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा शिवसेना आणि शिवसैनिक सर्व बंधनं झुगारुन मैदानात उतरतो. आम्ही काय करू शकतो हे खेडमध्ये दाखवून देऊ. हा इशारा ज्यांनी शिवसेनेच्या, वाघाच्या शेपटावर पाय ठेवला, त्यांना आहे, असं राऊत म्हणाले.

मोहिते-पाटलांच्याविरोधात उमेदवार देऊ

खेडमध्ये सुरू असलेलं फोडाफोडीचं राजकारण त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत नेलं जाईल, पण हे राजकारण घाणेरडं आहे. पंचायत समिचीचा विषय आमच्यासाठी संपलाय. आम्हीही माणसं फोडू शकतो. पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे आम्ही ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा, आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर आम्ही काय करायचं हे आम्ही पाहू. दिलीप मोहिते यांची वागणूक अशीच असेल, तर महाविकास आघाडी असो की नसो इथे शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे आमदार दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून आणू, असा इशारा राऊत यांनी दिला.

माज करू नका

जे खेडला घडलं त्याचं खापर आम्ही शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर फोडणार नाही. त्यांचे आमचे सरकारमधील संबंध चांगले आहेत, चांगले राहतील. खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यामुळेच तालुक्यात आघाडीची बिघाडी झाली आहे. पंचायत समितीच्या जागेवरून हे रेटून नेत आहेत, त्यांना माज आलाय असंच म्हणावं लागेल. थोडीफार सत्ता आहे म्हणून माज करू नका, शिवसेना उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

तर आम्ही बंदोबस्त करू

मी जे काही बोलत आहे, ते मानाचं सांगत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच मी बोलत आहे. महाराष्ट्रात चांगलं सुरू असताना पुण्यात कुरबुरी करणारे लोक असतील तर अजित पवारांनी त्यांचा बंदोबस्त करावा. जर अजित पवाराचं ऐकत नसेल तर आम्हाला परवानगी द्यावी, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू, असा इशाराही त्यांनी दिला. (sanjay raut slams ncp mla dilip mohite patil)

 

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंना नेमका कसला माज? महाविकास आघाडी असो की नसो, त्यांना पाडणार : संजय राऊत

ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री: देवेंद्र फडणवीस

VIDEO: अजितदादा आणि टोपे इन अ‍ॅक्शन; दर आठवड्याला कोरोनाबाधित जिल्ह्यांचा दौरा करणार

(sanjay raut slams ncp mla dilip mohite patil)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI