SET Exam: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार करता ज्या उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत त्यांना अर्ज संधी मिळावी यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. (SET Exam)

SET Exam: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 6:47 PM

पुणे: कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार करता ज्या उमेदवारांना आतापर्यंत अर्ज भरता आले नाहीत त्यांना अर्ज संधी मिळावी यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात 26 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या 37 व्या राज्य पात्रता परीक्षेचा (सेट) अर्ज भरण्याची मुदत 10 जून ऐवजी आता 17 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. (SET Exam application dates extended by set exam department of Savitribai Phule University Pune)

दरम्यान, 18 जून ते 25 जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना 500 रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत. ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी सेट विभागाकडून 26 ते 30 जून यादरम्यान दिली आहे. याबाबची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेट विभागाचे सदस्य सचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

या शहरांमध्ये होणार परीक्षा

सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली (37 वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार, 26 सप्टेंबर, 2021१ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदरहू परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व पणजी (गोवा) या केंद्रावर घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे.

परीक्षा शुल्क

१. खुला रु. 800/- (प्रक्रिया शुल्कासह)

२. इतर मागासवर्गीय/ भटक्या व विमुक्त जाती जमाती/ रू. 650/- (प्रक्रिया शुल्कासह) विशेष मागासवर्गीय (फक्त उन्नत व प्रगत गटात न मोडणाऱ्या उमेदवारांसाठी) (For Non-Creamy Layer)*/ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक (EWS) आणि विकलांग प्रवर्ग (PwD) / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / तृतीयपंथी / अनाथ

विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा फी फक्त क्रेडीट / डेबीट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बैंकिंगद्वारे भरावी. विद्यार्थ्यांनी अर्जाची छापील प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी सेट परीक्षेचे शुल्क केडिट/डेबीट कार्ड / इंटरनेट बँकिंग द्वारे अदा करतील त्यांनी याबाबतचा पुरावा जतन करून ठेवावा.

जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण (पात्र) असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही.

संबंधित बातम्या:

SET Exam 2021: सेटची परीक्षा 26 सप्टेंबरला; ‘या’ तारखेपासून अर्ज नोंदणीला सुरुवात

AICTE ने जारी केले शैक्षणिक कॅलेंडर, जाणून घ्या परीक्षेच्या तारखा आणि समुपदेशनाचा संपूर्ण तपशील

(SET Exam application dates extended by set exam department of Savitribai Phule University Pune)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.