jayant patil : ईडीची जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस, जयंत पाटील यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस आलीय. या नोटीससंदर्भातच शनिवारी बैठक झाल्याची चर्चा सुरु होती. त्यावर स्वत: जयंत पाटील यांनी प्रथमच स्पष्टीकरण दिले आहे.

jayant patil : ईडीची जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस, जयंत पाटील यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 2:50 PM

पुणे | 13 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात शनिवारी गुप्त भेट झाली. ही भेटी जयंत पाटील यांच्या भावाला अंमलबजावणी संचालनालय (ईडी) नोटीस आल्यामुळे झाली असल्याची चर्चा सुरु होती. यापूर्वी जयंत पाटील यांचीही ईडी चौकशी झाली होती. त्यामुळे आता जयंत पाटील यांच्या निकवर्तींना लक्ष केले जात असल्यामुळे बैठक झाल्याची चर्चा होती. या बैठकीबाबत अत्यंत गुप्तता पाळली गेली होती. परंतु बैठकीची बातमी माध्यमांना मिळाली. बैठकीत ईडीच्या नोटीससंदर्भात काय चर्चा झाली? यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

जयंत पाटील यांची चौकशी झाली होती

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर दोन गट तयार झाले. एक गट अजित पवार यांच्याबरोबर गेला तर दुसरा गट शरद पवार यांच्याबरोबर आहे. जयंत पाटील हे शरद पवार यांच्या गटात आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची ईडी चौकशी झाली होती. त्यात जयंत पाटील यांचाही समावेश आहे. जयंत पाटील यांची 22 मे 2023 रोजी ईडीने चौकशी केली होती. IL अँड FS कंपनीसंदर्भात त्यांना नऊ पेक्षा जास्त तास प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर २ जुलै रोजी अजित पवार यांनी बंड केले.

काय म्हणाले जयंत पाटील

जयंत पाटील अजित पवार यांच्या गटात गेले नाही. यामुळे त्यांच्या निकटवर्तींना ईडीची नोटीस आल्याची चर्चा सुरु होती. जयंत पाटील यांचे बंधू जयसिंगराव पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, माझ्या भावाला चार दिवसांपूर्वीच नोटीस आली होती. ईडीने त्यांच्याकडून काही माहिती मागितली होती. ती माहिती त्यांनी दिली. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीत ईडीच्या नोटीसीवर कोणतीही चर्चा झाली नाही.

हे सुद्धा वाचा

प्रकाश आंबेडकर यांचा दावा

ईडीच्या नोटीससंदर्भात भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची शनिवारी झालेली बैठक ही ईडीच्या नोटीसीसंदर्भात होती. परंतु या बैठकीत काय चर्चा झाली त्याची माहिती आपणास नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.