AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शरम वाटली पाहिजे, तुझा काय बंदोबस्त…’, शरद पवार आमदार सुनील टिंगरे यांच्यावर संतापले

"एका बिल्डराच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोन मूल जाताना त्यांना उडवलं. अशा वेळी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो. याच्यासाठी मते मागितली का? शरद पवारच्या नावाने मते मागितली, श्रद्धेने मते दिली. त्याचं तुम्ही असं उत्तर दायित्व केलं?", असा सवाल शरद पवारांनी केला.

'शरम वाटली पाहिजे, तुझा काय बंदोबस्त...', शरद पवार आमदार सुनील टिंगरे यांच्यावर संतापले
शरद पवार
| Updated on: Sep 27, 2024 | 10:50 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अतिशय सडकून टीका केली. “रांजणगावला गेल्यावर जसं गणपतीच दर्शन होतं तसं उद्योगाचं दर्शन होतं. पुण्यात आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं? पुण्याची चौकशी केली तर लोक काय सांगतात? कोयता गँग. बजाजचे कारखाने, किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचे वैशिष्ट. अलीकडची पिढी काय खाते माहिती नाही, कसल्या तरी गोळ्या खातात. ते खाल्लं की चंद्रावर जातात. सत्ताधारी काय करतात? हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आमचे आमदार दमदार आमदार. हा आमदार दमदार आहे? त्याचं नाव काय टिंगरे. तो कोणाच्या तिकिटावर निवडून आला? त्यावेळी नेता कोण होता? पक्षाची स्थापना कोणी केली? तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील. चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देवू नकोस”, असं शरद पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना सुनावलं.

“एका बिल्डराच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोन मूल जाताना त्यांना उडवलं. अशा वेळी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो. याच्यासाठी मते मागितली का? शरद पवारच्या नावाने मते मागितली, श्रद्धेने मते दिली. त्याचं तुम्ही असं उत्तर दायित्व केलं? सत्तेचा माज, तरुणान उद्ध्वस्त करतात, २०० च्या स्पीडने गाड्या चालवतात. अशा आमदाराला दमदार म्हणतात? शरम वाटली पाहिजे. अशा लोकांचा काय निकाल घेतला पाहिजे हे पाहिलं आहे”, असा घणाघात शरद पवारांनी केला.

‘या सरकारला जागा दाखवण्याचं…’

“ही आघाडी आम्ही कायम ठेवली आहे. या आघाडीचा सहकारी म्हणून शब्द देतो. महाराष्ट्राच चित्र बदलण्यासाठी जे जे करता येईल यासाठी बारकाईने लक्ष देवू. लेक लाडकी म्हणत असतील तर म्हणा. पण तिला तुम्ही चार वेळा निवडून दिलं आहे. आज गरज आहे ती म्हणजे संरक्षणाची. बदलापूरची घटना घडली. मुलींच्या रक्षणाची जबाबदारी टाळता येणार नाही. या सरकारला जागा दाखवण्याचं एतेहासिक काम आपण विधानसभेला करू”, असंदेखील शरद पवार यावेळी म्हणाले.

सुनील टिंगरे काय म्हणाले?

दरम्यान, शरद पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “शरद पवार माझ्यासाठी कालही आदरणीय होते. आजही आहेत आणि उद्याही राहतील. त्यांना माझा कान पकडायचा अधिकार आहे. मी त्यांना प्रत्युत्तर देणं मला शोभत नाही”, अशी प्रतिक्रिया सुनील टिंगरे यांनी दिली.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.