AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी आढळराव पाटील यांनी बोलावली अतितातडीची बैठक, बराच वेळ खलबतं, अखेर काय ठरलं?

शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, अशी शिवाजी आढळराव पाटील यांची इच्छा आहे. पण शिरुर लोकसभेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा या मतदारसंघावर दावा आहे.

शिवाजी आढळराव पाटील यांनी बोलावली अतितातडीची बैठक, बराच वेळ खलबतं, अखेर काय ठरलं?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 29, 2024 | 7:50 PM
Share

सुनील थिगळे, Tv9 प्रतिनिधी, पुणे | 29 फेब्रुवारी 2024 : शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली. शिरुर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी, अशी शिवाजी आढळराव पाटील यांची इच्छा आहे. पण शिरुर लोकसभेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे हे खासदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा या मतदारसंघावर दावा आहे. या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक लढण्याची शक्यता असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या. पण शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे यासाठी ते अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावरही निवडणूक लढण्यास तयार आहेत. यासाठी त्यांनी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

“शिरूर लोकसभा मतदारसंघ गेल्या आठवडाभर चर्चेत आहे. आढळराव हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाणार, अगदी पार्थ पवार इथून निवडणूक लढवणार, या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी काल पुन्हा भेटलो. ते म्हणाले अद्याप जागांचे वाटप झालेले नाही. मात्र अजित पवार म्हणाले त्यांचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर हक्क गाजवला आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले”, अशी प्रतिक्रिया शिवाजी आढळराव पाटील यांनी दिली.

‘कार्यकर्तेही म्हणत आहेत की, राष्ट्रवादीला जागा सुटली तर…’

“कदाचित त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. त्या अनुषंगाने मला जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याबाबत मला विचारणा झाली तर काय करायचं? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. कार्यकर्तेही म्हणत आहेत की, राष्ट्रवादीला जागा सुटली तर आपण घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू. पण शेवटचा आदेश हा मुख्यमंत्र्यांचा आहे”, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले.

“परिस्थितीनुसार निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचे सूर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा खासदार निवडून जाणे महत्वाचं आहे”, असं शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितलं. शिवाजी आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी प्रवेशावर अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. आढळराव अजित पवार गटात आले तर आपण राजकारण सोडू असं ते म्हणाले आहेत. याबाबत शिवाजी आढळराव पाटील यांना प्रश्न विचारला असता “निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर नाराजांचे मनधरणी करावी लागते”, अशी प्रतिक्रिया दिली.

Follow Us
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले...
मोठी बातमी! ओमराजेंच्याच भावाचा ओमराजेंवर गंभीर आरोप; थेट म्हणाले त्यांनी...  नेमकं प्रकरण काय?
प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
Raksha Bandhan 2026 | प्रसाद लाड यांना चित्रा वाघ यांनी बांधली राखी, पहा सुंदर फोटो
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार