“महाविकास आघाडीचं पुण्यातील एक काम दाखवा आणि 30 हजारांचं बक्षीस मिळवा”

राज्यात महविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे, असा आरोप मुळीक यांनी केला. सोशल मीडियावरील स्पर्धेमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत सध्या कलगीतुरा रंगला आहे.

महाविकास आघाडीचं पुण्यातील एक काम दाखवा आणि 30 हजारांचं बक्षीस मिळवा
Jagdish Mulik
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 10:57 AM

पुणे : महाआघाडी सरकारचे पुण्यातील (Pune) काम दाखवा आणि 30 हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळवा, अशी ऑफर भाजपने (BJP) दिली आहे. भाजपकडून राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया (Social Media) स्पर्धेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा दावा पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. राज्यात महविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे, असा आरोप मुळीक यांनी केला. सोशल मीडियावरील स्पर्धेमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत सध्या कलगीतुरा रंगला आहे.

जगदीश मुळीक नेमकं काय म्हणाले?

गेल्या साडेचार वर्षात पुणे मनपात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे शहरात अनेक चांगले निर्णय घेत, विकासकामे केली. तसंच मागील पाच वर्षात जेव्हा भाजपची सत्ता होती, त्यावेळी पुण्यात अनेक विकासकामं झाली. त्याआधी 15 वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता मनपामध्ये होती, तेव्हा त्यांनी पुण्यात कोणती कामं केली ते सांगावं. उगाच भाजपला विरोध करायचा, नागरिकांमध्ये अफवा पसरावायचं काम राष्ट्रवादीकडून सुरु आहे.

भाजपने मेट्रोला मान्यता दिली, मेट्रोचं काम 24 तास सुरु आहे. शहराच्या दृष्टीने पाणीपुरवठा प्रकल्प सुरु झाला, त्याचं अर्धे काम झालं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी बस खरेदी, दहा रुपयात प्रवास करता येतो, अशा चांगल्या सेवा सुरु केल्या.

मात्र मागच्या दोन वर्षात जेव्हापासून महाविकास आघाडी-राष्ट्रवादीचं सरकार या राज्यात आलं, तेव्हापासून ते एकही प्रकल्प पुण्यात आणू शकले नाहीत. कोव्हिड काळात पुण्यात कोणतीच मदत झाली नाही.

त्यामुळे आम्ही स्पर्धा आयोजित करत आहोत, राष्ट्रवादीच्या स्पर्धेला प्रतिउत्तर म्हणून. राज्य सरकारने या शहरासाठी केलेलं भरीव असं एक काम दाखवा आणि रोख रक्कम मिळवा, अशी स्पर्धा आहे असं जगदीश मुळीक म्हणाले.

संबंधित बातम्या 

एकमेकांकडे पाहण्यावरुन वाद, तरुणाच्या ‘गेम’साठी पिस्तूल खरेदीचा प्लॅन, पुण्यात तरुणाने एटीएम फोडले

दादा, तुमचं जेवढं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द; रुपाली चाकणकरांचा वार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.