पावसामुळे पुण्यातील 6 गावांचा संपर्क तुटला, नेटवर्क नसल्याने पंचाईत, ग्रामस्थांची मोठी गैरसोय

उंबर्डेवाडी, उंबर्डै, शिरगाव, आशिपी, शिळीब आणि कुड हीच ती सहा गावं असून मुसळधार पावसामुळे या गावांना जोडणारे रस्ते पाण्यात वाहून गेले आहेत.

पावसामुळे पुण्यातील 6 गावांचा संपर्क तुटला, नेटवर्क नसल्याने पंचाईत, ग्रामस्थांची मोठी गैरसोय
सांकेतिक फोटो
अश्विनी सातव डोके

| Edited By: prajwal dhage

Jul 26, 2021 | 7:50 PM

पुणे : जिल्ह्यातील घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे सहा गावांचा संपर्क तुटला आहे. उंबर्डेवाडी, उंबर्डै, शिरगाव, आशिपी, शिळीब आणि कुड हीच ती सहा गावं असून मुसळधार पावसामुळे या गावांना जोडणारे रस्ते पाण्यात वाहून गेले आहेत. आमची संपर्क व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत करावी अशी मागणी या गावातील ग्रामस्थांनी केली आहे. (Six villages have been cut off due to heavy rains and flood in Pune district Maharashtra)

सहा गावांचा संपर्क तुटला, गावाला जोडणारे सर्व रस्ते वाहून गेले 

कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले. कित्येक गावंच्या गावं पाण्याखाली गेली आहेत. याच मुसळधार पावसाची झळ पुणे जिल्ह्यालादेखील बसली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेती तसेच घरांचे नुकसान झाले आहे. कित्येक ठिकाणचे रस्तेसुद्धा वाहून गेले आहेत. मुसळधार पावसामुळे उंबर्डेवाडी, उंबर्डै, शिरगाव, आशिपी, शिळीब आणि कुड या पुण्यातील सहा गावांचा संपर्क तुटला आहे. या गावाला जोडणारे सर्व रस्ते वाहून गेले आहेत.

गावातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय, मोबाईल नेटवर्कसुद्धा उपलब्ध नाही

इतर गावांशी संपर्क तुटलेल्या या सहा  गावांमध्ये मोबाईल नेटवर्कसुद्धा उपलब्ध नाही. याच कारणामुळे येथील ग्रामस्थांना इतर लोकांशी संवाद साधणे अवघड झाले असून ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. या गावांतील संपर्क व्यवस्थेसोबतच इतर सर्व सुविधा सुरळीत करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, उद्धव ठाकरे यांचे आश्वसन

दरम्यान सांगली, सातारा, पुणे तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला. या पावसामुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोकांचा मृत्यू घरांवर दरडी कोसळल्यामुळे झाला. या सर्व नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या पाहणीनंतर कोणावरही अन्याय होणार नाही. सर्वांची योग्य ती काळजी घेतली जाईल. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वसन ठाकरे यांनी दिले.

इतर बातम्या :

खराब हवामानाचा फटका, अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा रद्द

पुण्यात अतिवृष्टीचा फटका, 12 गावं अंधारात, 7 गावांचा संपर्क तुटला, संपूर्ण कोंढरी गाव स्थलांतरीत

15 टक्के शुल्क कपात, शालेय फी वाढीसंदर्भात राज्य सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, अध्यादेश आणण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

(six villages have been cut off due to heavy rains and flood in Pune district Maharashtra)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें