Pune News | पुणे शहरात प्रथमच धावणार ही बस…वाहतूक कोंडीतून होणार सुटका

Pune sky bus | पुणे शहरात पीएमपीएमएलची बससेवा सुरु आहे. त्यानंतर पुणेकरांसाठी मेट्रो आली आहे. आता पुढे जाऊन पुणे शहरात नवीनच बससेवा सुरु होणार आहे. येत्या दोन वर्षांत ही बस पुणेकरांना मिळणार आहे. केंद्रीय पातळीवर त्यासाठी निर्णय झाला आहे.

Pune News | पुणे शहरात प्रथमच धावणार ही बस...वाहतूक कोंडीतून होणार सुटका
Sky Bus
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 11:12 AM

पुणे | 23 ऑक्टोंबर 2023 : पुणेकरांसाठी वाहतूक कोंडी नेहमीचा विषय झाला आहे. वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पुणे शहरात मेट्रो आली. मेट्रोमुळे जलद प्रवास सुरु झाला. पीएमपीएमएलचा बसला पर्याय मिळाला आहे. आता पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक नवीन पर्याय लवकरच मिळणार आहे. पुणे शहरात सुरु होणाऱ्या या बससाठी केंद्रीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. देशात प्रथमच पाच शहरात ही बससेवा सुरु होणार असून त्यात पुणे शहराचा समावेश केला गेला आहे. येत्या दोन वर्षांत ही सेवा सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मडगावात होणार ट्रॉयल रन

पुणे शहरासह वाराणसी, हैदराबाद, गुरुग्राम आणि गोवा शहरात स्काय बस सुरु होणार आहे. या बससाठी ट्रॉयल रन यावर्षीच होणार आहे. ही ट्रॉयल रन गोवा ते मडगाव दरम्यान घेण्यात येणार आहे. मडगावात यासाठी यापूर्वीच रुट तयार करण्यात आला होता. परंतु 2016 मध्ये ट्रॅक आणि पिलर काढण्यात आले. त्यावेळी हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाकडे होता. आता नितीन गडकरी यांच्या परिवहन मंत्रालयामार्फत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

असा बनवण्यात येणार रुट

स्कायबससाठी फक्त स्थानकासाठी जमीन लागणार आहे. स्कायबसचा रुट डिव्हाइडर वरती करण्यात येणार आहे. डिव्हाइडरवर पिलर बसवून हा रुट तयार केला जाणार आहे. स्काय बस 100 किमी वेगाने धावू शकते. यासाठी अप अन् डाऊन अशा दोन पटरी तयार कराव्या लागणार नाही. यासाठी स्थानकावर ट्रावर्सर या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

हे सुद्धा वाचा

मेट्रोच्या तुलनेत 50% टक्के स्वस्त

मेट्रोच्या तुलनेत हा मार्ग 50% टक्के स्वस्त असणार आहे. मेन्टन्स खर्चही त्याचा कमी असणार आहे. या स्काय बसमधून एकावेळी 300 जण प्रवास करु शकतात. स्काय बसचे ट्रायल 2004 मध्ये झाले होते. परंतु चाचणी दरम्यान झालेल्या अपघातामुळे ही बससेवा सुरु झाली नाही. भारतात स्काय बसचे जनक कोकण रेल्वेचे निर्देशक बी.राजाराम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 2004 मध्ये गोवा ते मडगाव हा 1.6 किमीचा मार्ग तयार करण्यात आला होता.

बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक.
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके.
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन.
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज.