सुशीलकुमार शिंदे यांना धक्का, मोठ्या नेत्याने दिला काँग्रेसचा राजीनामा

कधीकाळी काँग्रेसचा गड असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला धक्के बसत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा कट्टर समर्थक असलेल्या दुसऱ्या नेत्यानेही काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्हा काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिलेय.

सुशीलकुमार शिंदे यांना धक्का, मोठ्या नेत्याने दिला काँग्रेसचा राजीनामा
सुशीलकुमार शिंदेImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 9:52 AM

सागर सुरवसे, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पुन्हा धक्का बसला आहे. शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या युवा कार्यकर्त्याने मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता सोलापूरचे माजी खासदाराने काँग्रेसला रामराम ठोकला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस कमकुवत होणार आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्यांसमोर भाजपबरोबर आता भारत राष्ट्र समितीचे आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानांचा सामना काँग्रेस कसे करणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

कोणी दिला सुशीलकुमार शिंदे यांनी धक्का

सोलापूरचे काँग्रेसचे माजी खासदार धर्माण्णा सादुल यांचा काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शहराध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्ती आणि काँग्रेसचे माजी खासदार धर्माण्णा सादुल यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भारत राष्ट्र समितीची वाट धरली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देताना मला दुःख होत आहे. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे मी राजीनामा देत असल्याचे धर्माण्णा सादुल यांनी म्हटलेय. ते म्हणाले की, पक्षाने मला भरपूर दिले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल मला आदर आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानत पत्राद्वारे माझ्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. तो मंजूर करावा” अशी विनंती पक्षाला केलीय.

हे सुद्धा वाचा

शहराध्यक्षांकडे दिला राजीनामा

काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे धर्माण्णा सादुल यांनी राजीनामा दिलाय. आता माजी खासदार धर्माण्णा सादुल हे लवकरच भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे सोलापुरात काँग्रेससमोर भाजप आणि भारत राष्ट्र समितीचे आव्हान उभे राहणार आहेत.

कोण आहेत सादुल

धर्माण्णा सादुल हे काँग्रेसचे माजी खासदार आणि सोलापूरचे माजी महापौर आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी वेगळी वाट निवडलीय. ते लवकरच भारत राष्ट्र समितीत दाखल होणार आहे. सोलापुरात भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर राव यांची सभा होणार असून त्यात त्यांचा प्रवेश होणार आहे.

मागील आठवड्यात यांनी दिला धक्का

सोलापुरातील दादा प्रतिष्ठानचे प्रमुख आणि युवा नेते उदयशंकर पाटील यांनी मागील आठवड्यात भाजपत प्रवेश झाला होता. यामुळे सोलापुरात भाजपचे मिशन 2024 चे सुरु झाले आहे.  श्रीकांत भारतीय यांनी  उदयशंकर पाटील यांना भाजपमध्ये येण्यासाठी गळ घातली होती. अखेरी त्यात ते यशस्वी ठरले. उदयशंकर पाटील व आता धर्माण्णा सादुल यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे सोलापूरच्या राजकारणातील समीकरणे बदलणार आहे.

हे ही वाचा

भाजपकडून सुशीलकुमार शिंदे यांची कोंडी, कट्टर समर्थकाचा भाजप प्रवेश.

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.