Pune ST employees : एसटीच्या प्रवाशांना दिलासा, पुणे विभागात एसटी सुरू; काही कर्मचारी मात्र अजूनही संपावरच

पुणे विभागात एसटीची (ST) सेवा पूर्ववत झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जिल्ह्यातील वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत 1 हजार 892 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर अजूनही 2 हजार 300 कर्मचारी संपात सहभागी आहेत.

Pune ST employees : एसटीच्या प्रवाशांना दिलासा, पुणे विभागात एसटी सुरू; काही कर्मचारी मात्र अजूनही संपावरच
एसटी बस (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 9:43 AM

पुणे : पुणे विभागात एसटीची (ST) सेवा पूर्ववत झाली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसह जिल्ह्यातील वाहतूकही सुरळीत सुरू झाली आहे. पुणे विभागात आतापर्यंत 1 हजार 892 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तर अजूनही 2 हजार 300 कर्मचारी संपात सहभागी आहेत. मात्र हजर झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक पूर्वपदावर आली आहे. विभागातील 11 डेपोतून गाड्या सुरळीत सुरू झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने (High Court) एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी पूर्ववत सुरू होण्यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठकही घेतली होती. संपामुळे गेले 5 महिने एसटीच्या गाड्या उभ्या होत्या. यापैकी काही गाड्या नादुरूस्त असतील त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

काही कर्मचारी अजूनही संपावर

उच्च न्यायालयाच्या आदेशालाही काही कर्मचारी जुमानत नसल्याचे दिसत आहे. पुणे विभागात आतापर्यंत 1 हजार 892 कर्मचारी जरी कामावर हजर झाले असले तरी अजूनही 2 हजार 300 कर्मचारी संपात सहभागी आहेत. या आडमुठ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वांना कामावर परतणे बंधनकारक आहे. मात्र ते अद्याप कामावर परतले नसल्याने त्यांचे निलंबन होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा :

Pune Metro : पुण्याच्या खडकीतही लवकरच उभे राहणार मेट्रोचे खांब; मिळणार जागेचा ताबा

Sanjay Dutt: “पत्नी, मुलांचा विचार करत मी दोन-तीन तास रडलो”; संजय दत्तने सांगितला कॅन्सरशी लढा देतानाचा अनुभव

Toilet Scam : टॉयलेट घोटाळ्यावर कारवाई करण्यापूर्वी आमच्याशी संपर्क करा; किरीट सोमय्यांचे पत्रं

Non Stop LIVE Update
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.