Dhangar Reservation : पत्नीचं कुंकू पुसून आलो; तिला म्हणालो आलो तर तुझा नाही तर… सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावली

धनगर समाजाच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस आहे. नगरच्या चौंडी येथे हे उपोषण सुरू आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. या आरक्षणासंदर्भात काल शासकीय स्तरावर बैठक झाली. पण ही बैठक...

Dhangar Reservation : पत्नीचं कुंकू पुसून आलो; तिला म्हणालो आलो तर तुझा नाही तर... सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावली
suresh bandgarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 12:14 PM

कुणाल जायकर, टिव्ही9 मराठी प्रतिनिधी, नगर | 22 सप्टेंबर 2023 : चौडी येथे धनगर समाजाचं आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब रुपनर आणि सुरेश बंडगर यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 17 वा दिवस आहे. या दोन्ही नेत्यांनी कालपासून सलाईन लावणं बंद केलं आहे. पाण्याचाही त्याग केला असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यातच सरकारसोबतची धनगर समाजाच्या नेत्यांची बैठक निष्फळ ठरल्याने धनगर समाजामध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे.

चौंडी येथे सुरेश बंडगर यांचं उपोषण सुरू आहे. यावेळी टीव्ही9 मराठीशी बोलताना बंडगर यांनी आपण पाणीही सोडलं, उपचारही घेणार नाही असं स्पष्ट केलं. काल आमचे पदाधिकारी बैठकीला गेले होते. मला काल सलाईन लावलं होतं ते काढून टाकलं. मी कोणताही उपचार घेणार नाही. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील, असं सुरेश बंडगर म्हणाले.

गेलो तर समाजाचा, आलो तर…

धनगर आरक्षणाच्या लढ्यासाठी मी घरातून बाहेर पडलो. ज्या दिवशी मी घरातून बाहेर पडलो त्या दिवशी मी पत्नीचं कुंकू पुसून आलो होतो. धनगर समजाच्या आरक्षणासाठी जात आहे. गेलो तर समजााचा. आलो तर तुझा असं पत्नीला सांगितलं. जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्तयं उपोषण सुरूच राहील, असं बंडगर म्हणाले. प्राण गेले तरी चालेल मात्र जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

आंदोलनावर ठाम

मुंबई येथे काल धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात महत्वाची बैठक होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याने चौंडी येथील उपोषणकर्ते आंदोलनावर ठाम आहेत. सरकारने धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर दोन महिन्याची वेळी मागितली आहे. मात्र, दोन महिने हा कालावधी निव्वळ वेळकाढूपणा आहे, असं यशवंत सेनेला वाटतंय.

भाजपला पायउतार करणार

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चौंडीत उपोषण करत आहेत. आज उपोषणाचा 17 वा दिवस आहे. या आंदोलनातील अण्णासाहेब रुपनर आणि सुरेश बंडगर यांची प्रकृती बिघडली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास बंडगर यांनी नाकार दिला असून येत्या काळात भाजपाला पाय उतर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुरेश बंडगर यांनी दिलाय.

पडळकर यांनी घेतली भेट

दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी चौंडी येथील उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर यांची भेट घेतली. पुण्यातील ससून हॉस्पिटल जाऊन पडळकर यांनी त्यांची विचारपूस केली. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी रुपनवर यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची तब्बेत खालावल्याने आण्णासाहेब रुपनवर यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ
नांदेडमधील मैदान मराठ्यांच्या गर्दीनं कच्चून भरलं, नुसत भगवं वादळ.
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.