AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्हाला एक लाख नको, पण…’, अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या गुणाट गावातील ग्रामस्थ संतापले

Swargate Rape Case: पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गुणाट गावातील रहिवाशी आहे. त्याने पीडीत तरुणीवर अत्याचार केल्यानंतर पळ काढला होता. तो गुणाट परिसरातील शेतांमध्ये लपला होता.

'आम्हाला एक लाख नको, पण...', अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या गुणाट गावातील ग्रामस्थ संतापले
Dattatraya GadeImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 04, 2025 | 1:11 PM
Share

Swargate Rape Case Accused Dattatraya Gade: स्वारगेट एसटी बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला २८ फेब्रुवारीला अटक केली. त्याच्या अटकेवरुन श्रेयवादीची लढाई सुरु झाली आहे. गाडे याची माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांना १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. शेवटी पोलिसांनी त्याला गुणाट ग्रामस्थांच्या मदतीने पकडले. त्यानंतर गुणाट गावात एक लाखाच्या बक्षीसावरून श्रेयवाद सुरू असल्याच्या बातम्या आले. त्यामुळे गुणाट गावातील ग्रामस्थ संतप्त झाले. गावात कोणताही वाद नाही. आमच्या गावची बदनामी थांबवा. आम्हाला एक लाखाचे बक्षीस पण नको, असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

गावकऱ्यांनी आरोपीला पकडले होते…

पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा गुणाट गावातील रहिवाशी आहे. त्याने पीडीत तरुणीवर अत्याचार केल्यानंतर पळ काढला होता. तो गुणाट परिसरातील शेतांमध्ये लपला होता. त्याची माहिती देणाऱ्यास पोलिसांनी 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. तब्बल 72 तास गावात ड्रोन, डॉगस्कॉड तसेच पोलिसांची 13 पथके होती. अखेर गुणाट गावतील ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना दत्ता गाडे याला पकडले. त्यानंतर काही माध्यमांमध्ये गुणाट गावात या एक लाखाच्या बक्षीसावरून श्रेयवाद सुरू असल्याच्या बातम्या आल्या.

ग्रामस्थ काय म्हणतात…

गावातील आलेल्या बातम्यांवर ग्रामस्थ म्हणाले, गावात कोणताही वाद नाही. मुळात आम्हाला एक लाखाचे बक्षीससुद्धा नको. पण आमच्या गावची बदनामी थांबवा. आम्हाला डीसीपींनी मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार मदत करावी, असा निर्णय आम्ही घेतला, असे गुणाट गावाचे सरपंच रामदास काकडे यांनी म्हटले.

गावाचे पोलीस पाटील हनुमंत सोनवणे म्हणाले, आम्ही गुन्हेगारास पकडून दिले आहे. पोलिसांना सहकार्य केले आहे. आमच्या गावात बक्षीसाठी कोणताही वाद नाही. त्यामुळे त्या संदर्भातील चुकीच्या बातम्या देऊ नये. आमच्या गावातील बदनामी होवू नये, म्हणून आम्ही आरोपीला पकडून दिले. दत्तात्रय गाडे या आरोपीला पकडून देणारे ग्रामस्थ प्रा. गणेश गव्हाणे यांनी गावात बक्षीसावरुन वाद असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले. आम्हाला बक्षीस नको आहे.

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....