AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘टाटां’मुळे पुण्याचा पाणी प्रश्न मिटणार, काय आहे पुणेकरांसाठी योजना

Pune Water and Tata Company | पुणेकरांना पाच टिएमसी पाणी मिळण्यासाठी मुळशी धरणाची उंची वाढवण्यात येणार आहे. यामुळे जो पाण्याचा अतिरिक्त फुगवटा होईल, त्यातून पुणे शहराला पाणी देता येणार आहे. धरणाची १ मीटरने उंची वाढवल्यानंतर हे पाणी मिळणार आहे.

'टाटां'मुळे पुण्याचा पाणी प्रश्न मिटणार, काय आहे पुणेकरांसाठी योजना
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 22, 2024 | 2:42 PM
Share

प्रदीप कापसे, पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2024 | यंदा पाऊस कमी झाला आहे. यामुळे पुणे शहरात पाणी टंचाईची शक्यता आहे. तसेच पुणे शहराची लोकसंख्या वाढली आहे. यामुळे सध्याचे नियोजन पुणे शहरासाठी अपूर्ण पडत आहे. पुणे शहराला सध्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणामधून पाणीपुरवठा केला जातो. परंतु पुणेकरांच्या भविष्यातील पाण्याचा प्रश्न “टाटा” सोडवणार आहे. टाटा कंपनीकडून पुणेकरांना मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी देण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे. टाटा कंपनीच्या मालकीचे असलेल्या मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही होते. त्यांना टाटा कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

पुणेकरांना कसे मिळणार पाच टीएमसी पाणी

पुणेकरांना पाच टिएमसी पाणी मिळण्यासाठी मुळशी धरणाची उंची वाढवण्यात येणार आहे. यामुळे जो पाण्याचा अतिरिक्त फुगवटा होईल, त्यातून पुणे शहराला पाणी देता येणार आहे. धरणाची १ मीटरने उंची वाढवल्यानंतर हे पाणी मिळणार आहे. अजित पवार यांनी यासंदर्भात जलसंपदा विभागाची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले.

उंची वाढल्यामुळे जमीन पाण्याखाली जाणार

मुळशी धरणाची उंची वाढल्यास पाण्याचा फुगवटा तयार होईल. त्यामुळे परिसरातील जमीन पाण्याखाली जाणार आहे. पाण्याखाली जाणारी ८० टक्के जमीन टाटा कंपनीच्या मालकीची आहे. परंतु २० टक्के जमीन शेतकऱ्यांची आहे. ही जमीन राज्य सरकारकडून संपादीत केली जाणार आहे. यामुळे हा विषय निकाली निघणार आहे. अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला टाटा कंपनी, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त उपस्थित होते.

पुण्यासह ५० गावांना पाणी

मुळशी धरणाबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. यासंदर्भात टाटा कंपनीची भूमिका अजित पवार यांनी समजून घेतली. तसेच कंपनीच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, असे अजित पवार यांनी दिले. त्यामुळे टाटा कंपनीने या ५० गावांना पाणी देण्याचा निर्णय मान्य केला आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...