Prithviraj Chavan: Operation Sindoor मध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव; पृथ्वीराज चव्हाण हे काय बोलून गेले? अशी मुक्ताफळं उधळली तरी का?

Prithviraj Chavan on Operation Sindoor: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं भाकीत केलं आहे. 19 डिसेंबर रोजी भारताचा पंतप्रधान बदलणार असल्याचा दावा त्यांनी केला. तर आता ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.

Prithviraj Chavan: Operation Sindoor मध्ये भारताचा पहिल्याच दिवशी पराभव; पृथ्वीराज चव्हाण हे काय बोलून गेले? अशी मुक्ताफळं उधळली तरी का?
पृथ्वीराज चव्हाण, ऑपरेशन सिंदूर
Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 16, 2025 | 10:04 PM

Prithviraj Chavan Statement: Operation Sindoor च्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला असे वक्तव्य करून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वाद ओढावून घेतला आहे. आज पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे अजब वक्तव्य केलं आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. यापूर्वी त्यांनी 19 डिसेंबर रोजी भारताचा पंतप्रधान बदलणार असल्याचे आणि मराठी माणूस पंतप्रधान होण्याचा दावा केला होता. या दाव्यावर ते ठाम आहेत. पण आज त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

युद्धाच्या पहिल्याच दिवशी पराभव

माध्यमांशी बोलताना, पाकिस्तानसोबत सुरू केलेले युद्ध मोठी घोडचूक होती असे वक्तव्य चव्हाण यांनी केले. आपली अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा १० पट मोठी आहे. मोदींनी अचानक युद्ध थांबवण्याचं का मान्य केलं असा सवाल करत, युद्धाच्या पहिल्याच दिवशी आपला पराभव झाला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. ऑपरेशन सिंदुरच्या पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाला या त्यांच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली. पाकिस्तानने आपली विमानं पाडल्याचा दावा त्यांनी केला. 7 मे 2025 रोजीच्या अर्ध्या तासाच्या पहिल्याच हवाई संघर्षात आपण हारलो. लोक हे स्वीकारतील की नाही, माहिती नाही. पण भारतीय विमानं पाकिस्तानने धराशायी केली. हवाई तळावरच त्या दिवशी विमान थांबवली गेली. एकाचेही उड्डाण करण्यात आले नाही. जर ग्वालियर, भटिंडा अथवा सिरसा येथून जर विमान उडवल्या गेलं तर पाकिस्तान ते पाडण्याची शक्यता अधिक होती असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कुठला आणि कसला दबाव आहे ते उत्तर आपण शोधले पाहिजे. मोदींवर अमेरिकाचा दबाव आहे. परराष्ट्र धोरणामध्ये आपण मागे आहोत. परराष्ट्र धोरणामध्ये आपल्याला अपयश आल्याचा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला.

अणुभट्ट्यांना आमचा विरोध

बाहेरून अणुभट्ट्या मागवायचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वर्ष 2008 पासून परदेशी कंपन्या भारतात आल्या नव्हत्या. अदाणीला या क्षेत्रात प्रवेश द्यायचा असा सरकारने निर्णय घेतला आहे असा आरोप चव्हाण यांनी केला. गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की आम्ही अणुचाचण्या करणार. त्यांनी केल्या म्हटल्यावर रशिया करणार भारत पण करणार. आम्ही त्याला विरोध करणार असे त्यांनी स्पष्ट केले. मी ते बोललो त्यामुळे कुतुहल निर्माण झाले आहे. मी ते का बोललो त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. 19 डिसेंबर महत्वाचे आहे तो पर्यंत पाहु आपण काय होतोय ते, असे चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी सध्या सुरू आहे. विरोधक म्हणून आम्ही कमी पडतोय कारण आमचे संख्याबळ कमी आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.