AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zeel education financial fraud | सव्वाचार कोटींचा गंडा घालणाऱ्या ‘झील’ एज्युकेशनच्या संस्थापकाला अखेर बेड्या; नेमके प्रकरण काय?

पुण्यात कार्यरत असलेल्या झील पॉलिटेक्नीक कॉलेजने वाढीव फी मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य शासनानाकडे पाठविला होता. या प्रस्तावात झील संस्थेत जवळपास डीचशे स्टाफ नोकरीवर असल्याचे दाखविण्यात आले होते. इतकेच नव्हेतर बनावट स्टाफच्या पगाराच्या खोटी पगारपत्रकेही जमा केल्या होत्या .

Zeel education financial fraud | सव्वाचार कोटींचा गंडा घालणाऱ्या 'झील' एज्युकेशनच्या संस्थापकाला अखेर बेड्या; नेमके प्रकरण काय?
| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 2:05 PM
Share

पुणे – संस्थेमध्ये कर्मचारी हजर नसतानाही बनावट स्टाफ दाखवून त्याआधारे जादा फी मंजूर करुन घेऊन विद्यार्थी व शासनाची 4 कोटी 25 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी झील एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी काटकर यांच्यासह तिघांना आर्थिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.  झील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष संभाजी मारुती काटकर (वय 65, रा. हिंगणे खुर्द सिंहगड रोड), झील पॉलिटेक्निकचे तत्कालिन प्राचार्य चंद्रकांत नारायण कुलकर्णी (वय 58, रा. दत्तनगर, कात्रज) आणि ऑडिटर युवराज विठठल भंडारी (वय 35, रा. आंबेगाव खुर्द) यांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे पुण्यात कार्यरत असलेल्या झील पॉलिटेक्नीक कॉलेजने वाढीव फी मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य शासनानाकडे पाठविला होता. या प्रस्तावात झील संस्थेत जवळपास डीचशे स्टाफ नोकरीवर असल्याचे दाखविण्यात आले होते. इतकेच नव्हेतर बनावट स्टाफच्या पगाराच्या खोटी पगारपत्रकेही जमा केल्या होत्या . या खोट्या माहितीच्या आधारे शिक्षण शुल्क समिती कडून फी मंजूर करुन घेत आरोपींनी विद्यार्थ्यांकडून जास्त फीची आकारणी केली. झील एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या झील पॉलिटेक्नीक कॉलेजने 2015-16 या शैक्षणिक वर्षात तब्बल 4 कोटी 25 लाख 29 हजार 482 रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

असा उघडकीस आला घोटाळा

झील संस्थेचे अध्यक्ष संभाजी काटकर यांच्या तक्रारीवरुन त्यांच्याच संस्थेतील कार्यालयीन अधीक्षक योगेश ढगे याच्याविरुद्ध 9  लाख रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी 2019 मध्ये अटक केली होती. त्यामुळे ढगे याने संस्थेच्या गैरव्यवहाराचा पोलखोल केला. त्याने विविध तपास संस्थांना सर्व कागदोपत्री पुरावेच सादर केले होते. झील संस्थेच्या एका कॉलेजमधील केवळ एका वर्षातील हा सव्वा चार कोटींचा गैरव्यवहार आहे. त्यांची इतरही काही कॉलेजच आहेत. या गैरव्यवहाराचा मुळातून शोध घेतल्यास तो 40 ते 50 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू झील एज्युकेशन सोसायटीचे अंतर्गत असलेल्या इंजिनिअरींग कॉलेज, एम.बी.ए कॉलेज, एम.सी.ए.कॉलेज या शैक्षणिक संस्थांमध्येही अनेक वर्षे अशा प्रकारे आर्थिक गैरव्यवहार केल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू होता. या तपासात फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याचे समोर आल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. करण्यात येत आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त विजय पळसुले, पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 26 January 2022

Budget 2022 : गरिबांच्या हाती जास्त पैसे देण्याची गरज, दुकान – सलून यांच्यासाठी सरकारने ECLGS ची करावी घोषणा !

Mr. and Mrs. Mahi : जान्हवी कपूरने करतेय क्रिकेटरचा रोल, भूमिकेसाठी दिनेश कार्तिकसोबत क्रिकेटची प्रॅक्टिस

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.