गेल्या वर्षी जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr. and Mrs. Mahi movie) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच या चित्रपटासंदर्भात उत्सुकता होती. या चित्रपटात जान्हवी कपूर क्रिकेटरच्या भुमिकेत दिसणार आहे.
1 / 5
जान्हवी कपूरने या संदर्भातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती क्रिकेटपटू दिनेश कार्तिकसोबतच क्रिकेटची प्रॅक्टिस करताना दिसत आहे.
2 / 5
ती दिनेश कार्तिककडून फलंदाजीचं प्रशिक्षण घेताना दिसत आहे. या फोटोला जान्हवीने 'क्रिकेट कॅम्प' असं कॅप्शन दिलं आहे.
3 / 5
या फोटोमध्ये जान्हवी कपूर क्रिकेटकिट घेऊन मैदानावर बसलेली दिसतेय. तिच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळताना दिसतेय.
4 / 5
या चित्रपटात जान्हवी कपूर आणि राजकुमार रावएकत्र पहायला मिळणार आहेत. याआधी हे दोघे ‘रुही’ या चित्रपटात एकत्र दिसले आहेत.