Pune rain : कुठे कोसळतायत झाडं तर कुठे दरडी, पुण्याच्या खेड तालुक्यातलं कळमोडी धरण मुसळधार पावसामुळे फुल्ल!

पुणे जिल्ह्यात जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाला होता. मात्र जुलै सुरू झाल्यापासून मागील तूट हा पाऊस भरून काढत आहे. तर सात जुलैपासून पावसाने अधिकच जोर धरला आहे.

Pune rain : कुठे कोसळतायत झाडं तर कुठे दरडी, पुण्याच्या खेड तालुक्यातलं कळमोडी धरण मुसळधार पावसामुळे फुल्ल!
मुसळधार पावसामुळे पूर्ण भरलं कळमोडी धरणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 5:12 PM

खेड, पुणे : खेड तालुक्यातील कळमोडी धरण (Pune dam) 100 % भरले आहे. कळमोडी हे पुणे जिल्ह्यातील पहिले 100 % टक्के भरलेले धरण म्हणता येईल. सांडव्यावरून आरळा नदीपात्रात 16.00 सेमीने 501.00 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कळमोडी धरणाची दीड टीमसी क्षमता आहे. आता हे धरण तर भरले आहे. पाऊस (Pune rain) मात्र अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे आरळा नदीकाठी असलेल्या गावांना खबरदारीचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. कळमोडी धरणातील पाणी चासकमान धरणात (Chaskaman dam) यायला सुरवात झाली आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिले तर चासकमान धरण लवकरच भरणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात जून महिन्यात अत्यल्प पाऊस झाला होता. मात्र जुलै सुरू झाल्यापासून मागील तूट हा पाऊस भरून काढत आहे. तर सात जुलैपासून पावसाने अधिकच जोर धरला आहे.

पोखरी घाटात कोसळली दरड

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील भीमाशंकर खोऱ्यात पावसाची संततधार सुरू असून धो धो पावसामुळे भीमाशंकर-मंचर महामार्गावरील पोखरी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात दाट धुके आणि मुसळधार पाऊस सुरू असून ज्योर्तिंलिंग भीमाशंकर मार्गावर दरड कोसळल्याने या ठिकाणची वाहतूक मंदावली आहे. एका बाजूने वाहतूक सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

खानापूर गावाच्या हद्दीत रस्त्यावर कोसळले झाड

पुण्याहून भोरमार्गे मांढरदेवी-महाबळेश्वरला जाणाऱ्या मार्गावर, खानापूर गावाच्या हद्दीत रस्त्यावर झाडे पडल्याने या मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून झाडे बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. सुदैवाने झाड कोसळले तेव्हा त्याठिकाणी कोणतेही वाहन अथवा व्यक्ती नसल्याने यात जीवितहानी झाली नाही. मात्र या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावरून प्रवास करताना दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. एकमेकांना स्फूर्ती मिळावी, यासाठी समूहाने गाणी म्हणून थकवा दूर केला जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.