पुण्यात भर दुपारी थरार, मनोरुग्णाची 35 फूट उंच होर्डिंगवरुन उडी

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात (Pune Railway) एक भीषण घटना घडली. एका मनोरुग्णाने 35 फुटी जाहिरात फलकावरुन उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला ससून रुग्णलयात (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.

पुण्यात भर दुपारी थरार, मनोरुग्णाची 35 फूट उंच होर्डिंगवरुन उडी
Pune mentally ill man jumped

पुणे : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात (Pune Railway) एक भीषण घटना घडली. एका मनोरुग्णाने 35 फुटी जाहिरात फलकावरुन उडी मारली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला ससून रुग्णलयात (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.

पुणे रेल्वे आणि बस स्थानकादरम्यान 35 फुटी जाहिरात फलक आहे. या फलकावर मनोरुग्ण चढला होता. हे चित्र पाहून नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलानेही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत मनोरुग्णाने तब्बल 35 फुटी जाहिरात फलकावरुन खाली उडी मारली.

पुणे स्टेशन परिसरात दुपारी दीडच्या सुमारास मनोरुग्ण व्यक्ती जाहिरातीच्या बोर्डवर चढली होती. हा बोर्ड 35 फूट उंच आहे. ही व्यक्ती तिथून उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर कसबा फायर स्टेशनचे कर्मचारी तिथे तातडीने दाखल झाले.

त्यांनी तसेच काही नागरिकांनी साईन बोर्डवर चढून त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. तसेच खाली जाळीही धरुन ठेवण्यात आली होती. मात्र त्याने जवानांना आणि वाचवण्यासाठी आलेल्या नागरिकांना चकवा देत थेट रस्त्यावर उडी मारली. यामध्ये त्याला गंभीर मुका मार लागला आहे. या मनोरुग्णाला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पिंपरीत गुन्हेगारी वाढली

दिवसा बंद असलेली घरे शोधून रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. घरफोडीतील दागिने घेणाऱ्या एका सोनाराला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या टोळीतील चार आरोपी फरार आहेत. आरोपींकडून 220 ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकल, गॅस सिलेंडर, होम थिएटर, बॅटऱ्या, कुलर, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण 18 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या 

बंद घरं हेरुन चोऱ्या, पिंपरीत दोघा सख्ख्या भावांना अटक, तब्बल 48 ठिकाणी घरफोड्या

येरवड्याचं मनोरुग्णालय कात टाकणार, सुधारणांसाठी 400 कोटीचा निधी मंजूर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI