AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC elections : पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत 20  प्रभागांची नावे बदलली ; काय आहेत नवीन नावे

प्रभाग रचनेची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीसाठीया आजी-माजी नगरसेवकांबरोबरच नवीन इकच्छुकांनीही पक्ष नेतृत्वाकडे आपली बाजू लावून  धरण्यास सुरुवात केली आहे. आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी सातत्याने पक्षाच्या डोळ्यासमोर येईल अशी कामे करण्यावर भर दिला जात आहे.

PMC elections : पुणे महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत 20  प्रभागांची नावे बदलली ; काय आहेत नवीन नावे
पुणे महानगरपालिका (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
| Updated on: May 17, 2022 | 12:27 PM
Share

पुणे- आगामी महानगरपालिका निवडणुकीची (Municipal elections) लगबग सगळीकडं सुरु झाली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षाच्या बांधणीलाही सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठीच्या महापालिकेने जाहीर नुकतीच अंतिम प्रभाग रचनेची (Ward List )यादी नुकतीच जाहीर केली आहे. महानगरपालिकेने जाहीर केलेल्या अंतिम प्रभागांच्या यादीमध्ये एकूण 20 प्रभागांच्या नावामध्ये बदल झाला आहे.आगामी निवडणूक त्रिसदस्यीय प्रभाग या पद्धतीने होणार आहे. पुणे महानगरपालिकेने मार्च महिन्यातच प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला होता. त्यावर नागरिकांच्या(Citizen) हरकती व सूचना मागवण्यात आल्या होता. त्यानंतर नुकताच म्हणापलिकने प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे. या निवडणुकीसाठी एकूण 58 प्रभाग असून त्यातील 20 प्रभागाच्या नावात बदल झाला आहे.

कुठल्या प्रभागाचे काय नाव?

पूर्व खराडी-वाघोली (प्रभाग क्रमांक4),

पश्चिम खराडी-वडगांवशेरी (प्रभाग क्रमांक 5),

वडगांवशेरी-रामवाडी (प्रभाग क्रमांक 6),

बोपोडी-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (प्रभाग क्रमांक 11),

पंचवटी-गोखलेनगर (प्रभाग क्रमांक 15),

शनिवार पेठ-नवी पेठ (प्रभाग क्रमांक 17),

छत्रपती शिवाजी महाराज मैदान-रास्ता पेठ (प्रभाग क्रमांक 19),

पुणे स्टेशन-मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता (प्रभाग क्रमांक 20),

कोरेगांव पार्क-मुंढवा (प्रभाग क्रमांक 21),

मांजरी बुद्रुक-शेवाळवाडी (प्रभाग क्रमांक 22),

वानवडी गावठाण- वैदुवाडी (प्रभाग क्रमांक 26),

कासेवाडी-लोहियानगर (प्रभाग क्रमांक 27),

महात्मा फुले स्मारक-भवानी पेठ (प्रभाग क्रमांक 28),

महात्मा फुले मंडई-घोरपडे पेठ उद्यान (प्रभाग क्रमांक29),

भुसारी कॉलनी-बावधन खुर्द (प्रभाग क्रमांक 32),

आयडियल कॉलनी-महात्मा सोसायटी (प्रभाग क्रमांक33),

बिबवेवाडी-गंगाधाम (प्रभाग क्रमांक 40),

काळे-बोराटेनगर-ससाणेनगर (प्रभाग क्रमांक 44),

बालाजीनगर-शंकर महाराज मठ (प्रभाग क्रमांक 49),

वडगांव बुद्रुक-माणिकबाग (प्रभाग क्रमांक 51) अशी प्रभागांची नवी नावे आहेत.

उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु

प्रभाग रचनेची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आरक्षणाच्या सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीसाठीया आजी-माजी नगरसेवकांबरोबरच नवीन इकच्छुकांनीही पक्ष नेतृत्वाकडे आपली बाजू लावून  धरण्यास सुरुवात केली आहे. आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी सातत्याने पक्षाच्या डोळ्यासमोर येईल अशी कामे करण्यावर भर दिला जात आहे. मात्र नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार आणि कुणाला नाही हे आरक्षणाची सोडत झाल्यानंतर ठरणार आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.