Omicron alert| पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने २ हजारांचा टप्पा ओलांडला

ओमिक्रॉनचा वाढत धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाबरोबरच महानगरपालिका ही वेगवान लसीकरण मोहीम राबवत आहे. शहरात सद्यस्थितीला 185 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु आहे. याबरोबरच शहरातील आरोग्य यंत्रणाही सर्तक असून वाढत धोका लक्षात घेत रुग्णालये सज्ज  ठेवण्यात आली आहेत.

Omicron alert| पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने २ हजारांचा टप्पा ओलांडला
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 1:25 PM

पुणे – देशासह राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्या वाढत आहेत. दुसरीकडं ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येबरोबरच कोरोनाची रुग्णसंख्याही वाढ आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येनं पुन्हा दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात तब्बल २ हजार ५३ रुग्ण आहेत. यापैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयात कोरोनाबाधितवर उपचार सुरु आहे.

शहरातील कोरोना स्थिती शहरात काल (मंगळवार)  171 कोरोनाबाधित आढळून आले.  असून, 91  जण कोरोनामुक्त झाले आहेत़ पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे आज एकजणाचा मृत्यू झाला आहे़ सध्या विविध रुग्णालयांत सध्या 85  गंभीर रुग्णांवर तर 57 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ शहरात आतापर्यंत 38 लाख 45 हजार 409 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यांतील 5 लाख 9 हजार 276 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यांपैकी 4  लाख 99 हजार92 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात 9 हजार 115 जणांचा मृत्यू झाला आहे.

लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर

ओमिक्रॉनचा वाढत धोका लक्षात घेत जिल्हा प्रशासनाबरोबरच महानगरपालिका ही वेगवान लसीकरण मोहीम राबवत आहे. शहरात सद्यस्थितीला 185 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु आहे. याबरोबरच शहरातील आरोग्य यंत्रणाही सर्तक असून वाढत धोका लक्षात घेत रुग्णालये सज्ज  ठेवण्यात आली आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच शहरातील चारशे बेडचे जम्बो कोविड रुग्णालयही सुज्ज करून ठेवण्यात आले आहे.

कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे  आवाहन ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेत शहारातील कोरोनाचे निर्बंध कडक करण्यात आले आहेत. मास्कचा वापर करणे , सोशल डिस्टन्सचे पालन करणे यासारख्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.

sugar cane : परिश्रमाला जोड नियोजनाची, सरकारने नाही पण शेतकऱ्याने करुन दाखवले दुप्पट उत्पन्न

मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपालांचं कडक शब्दात उत्तर, त्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया! काय म्हणाले सुभाष देसाई?

NMC scam : भाजपकडून का करण्यात येतेय तुकाराम मुंढेंच्या चौकशीची मागणी? स्टेशनरी घोटाळ्याशी मुंढेंचा संबंध!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.