छत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पुणेकरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य होणं आवश्यक अन्यथा….; राष्ट्रवादी काँग्रेसने दिला हा इशारा

भाजप केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित करुन महाराजांचा अपमान करत आहे. सहा मार्चला राष्ट्रवादी पंतप्रधान नरेंद मोदी यां  रस्त्यावर उतरून निषेध करणार भाजपचने घेतला निर्णय बदलला नाही तर राष्ट्रवादी उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहेत.

छत्रपतींच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा पुणेकरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य होणं आवश्यक अन्यथा....; राष्ट्रवादी काँग्रेसने दिला हा इशारा
प्रशांत जगताप
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 5:31 PM

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते महापालिकेच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याचे अनावरण फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत करणे हा महाराजांच्या अपमान आहे. पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पुणेकरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य होणं आवश्यक आहे. मात्र, भाजप केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित करुन महाराजांचा अपमान करत आहे. सहा मार्चला राष्ट्रवादी पंतप्रधान नरेंद मोदी यां  रस्त्यावर उतरून निषेध करणार भाजपचने घेतला निर्णय बदलला नाही तर राष्ट्रवादी उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुणे मेट्रोचं (Pune Metro) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच बरोबर महानगरपालिकेने उभारलेलया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही यावेळी करण्यात येणारा आहे.

भाजपसाठीचा महत्त्वाचा दौरा

आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचा हा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय. मात्र, पंतप्रधान मोदींचा हा दौरा वादाचा ठरण्याची शक्यता आहे. कारण पुण्यातील काँग्रेस नेत्यांनी मोदींच्या दौऱ्यावेळी निदर्शनं करण्याचा आणि मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनं मजुरांना त्यांच्या राज्यात परत जाण्यास सांगितल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी संसदेत केला होता. त्यानंतर काँग्रेस नेते अधिक आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, अशी आक्रमक मागणी काँग्रेसकडून करण्यात येतेय.

मोदींनी माफी मागावी आणि मगच यावं

आता पंतप्रधान मेट्रोच्या उद्घाटनासाठी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहेत. अशावेळी मोदींनी संसदेत केलेल्या वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्राची माफी मागावी आणि मगच महाराष्ट्रात यावं. माफी मागितली नाही तर मोदींच्या दौऱ्यात निरर्शनं करणार आणि काळे झेंडे दाखवणार, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी दिलाय.

Up Elections 2022 : उत्तर प्रदेशात सातव्या टप्प्यासाठी मतदान, मोदी-योगींची जोडी गड राखणार?

राज्यपालांना अभिभाषण पूर्ण करु द्यायला हवं होतं, एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना फटकारलं

मोठी बातमीः औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टात सुनावणी, प्रभाग रचनेसंदर्भात काय आदेश?

Non Stop LIVE Update
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.