AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalicharan Maharaj: औरंगजेबाला जे हिरो मानतात, ते त्याच्या थडग्यावर माथा टेकवतात; हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकत्र आले पाहिजे – कालीचरण महाराज

औरंगजेब त्यांचा हिरो आहे, औरंगजेबाने पाच लाख मंदिरे फोडली. हिंदूंवर नाना विविध अत्याचार केले. ते बरोबरच होते ज्याअर्थी मंदिरे फोडण बरोबर होतं हे दाखविण्यासाठी आताचे जे जिहादी लोक आहेत. ते थडग्यावर माथा टेकतात हे हिंदूंना समजलं पाहिजे असा टोला त्यांनी अकबरुउद्दीन ओवेसीचे नाव न घेता लगावला आहे.

Kalicharan Maharaj: औरंगजेबाला जे हिरो मानतात, ते त्याच्या थडग्यावर माथा टेकवतात; हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एकत्र आले पाहिजे - कालीचरण महाराज
कालीचरण महाराज (प्रातिनिधिक फोटो )Image Credit source: tv9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 17, 2022 | 1:33 PM
Share

बारामती – औरंगजेबाला जे हिरो मानतात, ते त्याच्या थडग्यावर माथा टेकवतात. औरंगजेबाने(Aurangzeb) जे केलं तस करण्याचा विचार करत आहेत, हे हिंदूंना समजलं पाहिजे. हिंदूंनी सडका वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद जातीयवाद सोडून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाखाली एकत्र आले पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे(Chhatrapati Shivaji Maharaj)  मराठ्यांचे साम्राज्य स्थापित करू इच्छित नव्हते ते हिंदवी स्वराज्य स्थापित करू इच्छित होते म्हणून हिंदूंच्या स्वराज्यासाठी छत्रपती ने जे प्रयत्न केले त्याला आपण पुढे नेले पाहिजे. . भारताला हिंदुराष्ट्र बनवण्यासाठी वाटचाल केली पाहिजे. असे जहाल मत कालीचरण महाराज ( Kalicharan Maharaj)यांनी बारामती येथे बोलताना व्यक्त केलं आहे. त्यांनी दाखवून दिले आहे की औरंगजेब त्यांचा हिरो आहे, औरंगजेबाने पाच लाख मंदिरे फोडली. हिंदूंवर नाना विविध अत्याचार केले. ते बरोबरच होते ज्याअर्थी मंदिरे फोडण बरोबर होतं हे दाखविण्यासाठी आताचे जे जिहादी लोक आहेत. ते थडग्यावर माथा टेकतात हे हिंदूंना समजलं पाहिजे असा टोला त्यांनी अकबरुउद्दीन ओवेसीचे नाव न घेता लगावला आहे.

राज ठाकरे यांना माझं जाहीर समर्थन

पूर्वीच्या भाषा वादामुळे मन दुखावलेली आहेत. हिंदू भाषावाद केल्यामुळे, वर्णवाद केल्यामुळे, प्रांतवाद केल्यामुळे निसंशय तुटतोय ते पूर्वीचे जी मन दुखावलेली आहेत. त्यामुळे ही स्थिती आहे. ती स्थिती लवकरच निवळेल. कायदा आणि साहित्यबरोबर आहे. त्याचे काही इतर लोक आहेत ते श्रीराम प्रभुंच्या चरणी दर्शन घेण्यासाठी येणार असतील तर त्यांचे स्वागतच करू असे म्हटले आहेत. परंतु राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतलेला आहे, त्याचा उद्देश हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा आणि तो हातात घेत यामुळेच राज ठाकरे यांना माझं जाहीर समर्थन आहे.

खरी अभिव्यक्तीची स्वतंत्रता पायदळी तुडवली जाते

राष्ट्रद्रोह व राजद्रोह कशावरही लावून त्याला जामीन मिळून न देणे असे काही लोकांचे षड्यंत्र आहेत. इंग्रजांनी हा राष्ट्रद्रोहाचा कायदा बनवला होता. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे, त्यामुळे खरी अभिव्यक्तीची स्वतंत्रता पायदळी तुडवली जाते म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, राष्ट्रदोह आणि राजद्रोहाचा हा कायदाच राष्ट्रद्रोहाचा कायद्या सपुष्टात आणा. रवी राणा, नवनीत राणा यांना माझं जाहीर समर्थन आहे असे देखील कालीचरण महाराज यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?