तळ्यावर अंघोळीला गेले ते परतलेच नाही, दोन सख्ख्या भावांचा करूण अंत; कुठे घडली घटना?

राज्यात आज तीन ठिकाणी पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर सोलापुरात एक तरुण बुडून मेला आहे. नगरमध्येही एक मुलगा नदीत बुडून मरण पावला आहे. या घटनांमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

तळ्यावर अंघोळीला गेले ते परतलेच नाही, दोन सख्ख्या भावांचा करूण अंत; कुठे घडली घटना?
Nashik lakeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 29, 2024 | 4:52 PM

नाशिकच्या निफाड तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. दोन सख्खे भाऊ शेततळ्यावर आंघोळीला गेलेले असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. निफाड येथील नांदुर्डी रोडवर असलेल्या ढेपले वस्तीवर ही घटना घडली. प्रेम ढेपले आणि प्रतीक ढेपले असे दोघे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करून शेततळ्यावर आंघोळीसाठी दोघे शेततळ्यावर गेले होते. त्यावेळी ही घटना घडली.

निफाड येथील नांदुर्डी रस्त्यावर असलेल्या ढेपले यांच्या वस्तीवर विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्याकरता गोपाळ जयराम ढेपले यांची प्रेम आणि प्रतीक ही दोन्ही मुले विहिरीजवळ गेलेली होती. मात्र अर्धा तास उलटून देखील मुले का परत येत नाही हे बघण्यासाठी घरातील मंडळी त्यांना शोधण्यासाठी गेली. जवळपास शोध घेतला असता जवळच्या शेततळ्याजवळ एका मुलांचे कपडे त्यांना आढळून आले. मुले पाण्यात बुडाली अशी शंका येताच सर्वांनी धावपळ करून शेततळ्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र शेततळे गच्च भरलेले असल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला होता.

आधी छोटा भाऊ पाण्यात उतरला

प्राथमिक अंदाजानुसार लहान भाऊ प्रतीक हा आधी तळ्यात उतरला असावा. मात्र त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडायला लागला. त्याला बुडताना बघून त्याला वाचविण्यासाठी मोठा भाऊ प्रेम याने देखील पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि तळ्यातून बाहेर निघण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेचे वृत्त समजतात परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही बालकांची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

नगरमध्ये तरुण बुडाला

नगरच्या कोल्हार येथेही एक जण नदीत बुडून मरण पावला आहे. कोल्हार गावातील बागमळा येथील प्रवरा नदीत पोहण्यासाठी तिघेजण गेले होते. त्यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. अविनाश जोगदंड असं या मुलाचं नाव असून तो अवघा 15 वर्षाचा आहे. या तरुणाचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही. स्थानिक त्याचा शोध घेत आहेत. शिर्डी आणि कोपरगाव येथून बचाव दल मागवण्यात आलं असून तरुणाचा शोध घेतला जात आहे. मात्र, या तरुणाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

सोलापुरात एकाचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रामवाडी येथील भीमा नदीच्या पात्रात 17 वर्षीय ऋषिकेश बाळासाहेब वारगड या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऋषिकेश हा भीमा नदीपात्रातील मोटारकडे जात असताना नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडली आहे.

Non Stop LIVE Update
रत्नागिरीला रेड, या 11 जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट, यात तुमच्या जिल्हा आहे?
रत्नागिरीला रेड, या 11 जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट, यात तुमच्या जिल्हा आहे?.
जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शेंडगेंची चिथावणी, कुकरी-कोयत्यावरून नवा वाद?
जरांगेंच्या इशाऱ्यानंतर शेंडगेंची चिथावणी, कुकरी-कोयत्यावरून नवा वाद?.
शाही लग्नात खास पाहुण्यांना 2 कोटींचं रिटर्न गिफ्ट, नेमकं काय आहे खास?
शाही लग्नात खास पाहुण्यांना 2 कोटींचं रिटर्न गिफ्ट, नेमकं काय आहे खास?.
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प
कल्याणमध्ये पावसाची तुफान बॅटिंग अन् रस्त्याची नदी; 'या' महामार्ग ठप्प.
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ
बस स्थानक की स्विमींग पूल, तुफान पावसानं रायगडला झोडपलं, बघा व्हिडीओ.
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा
‘लाडकी बहीण’च्या अर्जास उशीर, काळजी करू नका कारण... दादांची मोठी घोषणा.
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप
पवारांचा सर्वपक्षीय बैठकीला खोडा, बारामतीत फोन अन्...; भुजबळांचा आरोप.
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी
ब्रेक फेल कंटेनरची 6-7 वाहनांना धडक अन् कंटनेर नाल्यात झाला पलटी.
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?
जरांगे या भुताला बाटलीत बंद करून समुद्रात फेका, कुणी केली खोचक टीका?.
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण...
मान्सून पिकनिकला लोणावळ्यातील भुशी डॅमवर जाताय? तर थोडं थांबा, कारण....