राज्यात दोन उपमुख्यमंत्री, मग गावात दोन उपसरपंच का नाही? या गावाने केली कमाल

Pune News : राज्यात दोन उपमुख्यमंत्री नेमले गेले. त्यानंतर गावात दोन उपसरपंच निवडण्यास परवानगी देण्याची मागणी पुणे जिल्ह्यातील गावाने केली. या गावाने दोन उपसरपंचांची निवड करुन ठराव जिल्हाधिकारींकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. या पॅटर्नची जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत आहे.

राज्यात दोन उपमुख्यमंत्री, मग गावात दोन उपसरपंच का नाही? या गावाने केली कमाल
जारकरवाडी ग्रामपंचायतने केला दोन उपसरपंचाचा ठरावImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 4:03 PM

सुनिल थिगळे, आंबेगाव, पुणे, दि. 24 नोव्हेंबर 2023 | राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. दोन उपमुख्यमंत्रीचा हा पॅटर्न राज्यात आघाडी आणि युती सरकार आल्यापासून सुरु झाला. संविधानात कुठेही दोन उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख नाही. मग राज्यातील हा पॅटर्न गावात सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गावाने हा प्रयोग राबवला. राज्यात दोन उपमुख्यमंत्री नंतर एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये दोन उप सरपंचपद आंबेगाव तालुक्यात झाले. ग्रामपंचायतीने आता दोन उपसरपंचांना अधिकृतरित्या मान्यता देण्यासंदर्भातील निवेदनही जिल्हाधिकारींना दिले आहे.

जारकरवाडी ग्रामपंचायतचा ठराव

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीनेने दोन उपसरंपच करण्याचा ठराव करून घेतला. त्यानंतर राज्यात जसे एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याप्रमाणे गावात एक सरपंच आणि दोन उपसरपंच म्हणून अधिकृतरित्या मान्यता देण्याचे निवेदन जिल्हाधिकारींना दिले आहे. गावात उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कौसल्या संतोष भोजने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर लगेचच सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांच्या बैठक झाली. या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करत दुसरे उपसरपंचपदी सचिन बाप्पू टाव्हरे यांची निवड केली

तालुक्यात चर्चेचा विषय

जारकरवाडी ग्रामपंचायतमध्ये दोन उपसरपंच निवडले गेल्यानंतर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. यासंदर्भात निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायतीने ठराव करुन २३/११/२०२३ रोजी ग्रामपंचायत जारकरवाडीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीबाबत ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम 2c(t) प्रमाणे नियम १९६५ मधील तरतुदीनुसार सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर याच्या सभा अध्यक्षाच्या खाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात येत आहे. तरी मी ST प्रवर्गातील सरपंचपदी असल्याने आणि आमच्या गावच्या लोकसंख्येच्या आणि गावच्या विस्ताराचा विचार करता मला ग्रामपंचायत जारकरवाडीसाठी दोन उपसरपंचाची नेमणूक करण्याची गरज वाटत आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कार्यभार स्विकारतात. त्याचप्रमाणे आमच्या जारकरवाडी गावामध्ये दोन उपसरपंचांची निवड केली आहे. त्या निवडीस मान्यता देण्याची मागणी या निवेदनात ग्रामपंचायतीने केली आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.