उजनीचा पाणीप्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन, पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ

जयंत पाटलांनी तोंडी आश्वासन न देता आंदोलनस्थळी लेखी आश्वासन द्यावे, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेने त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. (Ujani Water Solapur Farmers Protest )

उजनीचा पाणीप्रश्न पेटला, जयंत पाटलांच्या पुतळ्याचे दहन, पवारांच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ
जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 11:05 AM

पंढरपूर/बारामती : उजनीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे (Ujani Water Issue) सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. जलसंधारण मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे सोलापुरात दहन करण्यात आले. तर बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्थेक वाढ करण्यात आली आहे. (Ujani Water Issue Solapur Farmers Protest burns Jayant Patil effigy Sharad Pawar baramati residence security tighten)

लेखी अध्यादेशाची मागणी

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी जलाशयातून इंदापूर तालुक्यातील 22 गावांना पाच टीएमसी पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर तो निर्णय जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी रद्द करत असल्याचे सांगितले. मात्र जयंत पाटलांनी तोंडी आश्वासन न देता आंदोलनस्थळी लेखी आश्वासन द्यावे आणि शासन दरबारी तसा अध्यादेश काढावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

“उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी उजनी जलाशयातून इंदापूरसाठी पाणी पळवून नेले आहे. तो निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना, भाजप आणि इतर संघटनांकडून आंदोलनं करण्यात आली होती. त्यानंतर जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय रद्द केला असल्याचे सांगितले” असं प्रभाकर देशमुख म्हणाले.

जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

“त्या निर्णयाचा अध्यादेश लेखी घ्यावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी जनहित शेतकरी संघटनेकडून उजनी परिसरातील भीमनगर येथे बेमुदत उपोषण सुरु आहे. सोमवारी जयंत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. राज्य सरकार त्वरीत तोंडी आश्वासने देतात, मात्र लेखी आश्वासन देऊन उपोषण स्थळी अध्यादेश घ्यावा” अशी मागणी प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.

पवारांच्या बारामतीतील घराबाहेर सुरक्षेत वाढ

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते. त्यानंतर अनेक आंदोलकांची सोलापूर जिल्ह्यात धरपकड करण्यात आली. दोघा आंदोलकांना बारामती तालुक्यात अटक झाली आहे. आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या:

उजनीच्या धरणातील पाण्याचा आदेश रद्द, जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचा निर्णय

उजनीच्या पाण्याचा वाद: इंदापूरमध्ये टायर जाळून रास्ता रोको तर पंढरपूरमध्ये आनंदोत्सव

(Ujani Water Issue Solapur Farmers Protest burns Jayant Patil effigy Sharad Pawar baramati residence security tighten)

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.