AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात ‘लसीकरण आपल्या दारी’ अभिनव उपक्रम, पोतराज, नंदीवाल्यांना जनजागृती करुन लस

पुणे शहरात १०८ टक्के लसीकरण झाल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. यामध्ये अनेक लोकांकडे आधार कार्ड नसतात. ओळख पत्र नसते, अशा अनेक अडचणी येतात. परंतु लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम पुण्यातील बेघर वंचित लोकांसाठी आशादायी ठरत आहे.

पुण्यात 'लसीकरण आपल्या दारी' अभिनव उपक्रम, पोतराज, नंदीवाल्यांना जनजागृती करुन लस
वंचित समाजासाठी पुण्यात लसीकरण आपल्या दारी योजना
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 9:54 AM
Share

पुणे :  पुणे शहरात १०८ टक्के लसीकरण झाल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. यामध्ये अनेक लोकांकडे आधार कार्ड नसतात. ओळख पत्र नसते, अशा अनेक अडचणी येतात. परंतु लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम पुण्यातील बेघर वंचित लोकांसाठी आशादायी ठरत आहे.

वंचित समाजासाठी लसीकरण मोहिम

वंचित समाज पोतराज, गोधडी शिवण्याचा व्यवसाय करणारे, नंदीवाला या समाजात लसीकरणाबाबत अंधश्रद्धा होती. लस घेण्यासाठी हा समाज तयार होत नसे. जन जागृती नव्हती. कात्रज कोंढवा रस्ता परिसरातील प्रगती फाउंडेशनकडून लस परिसर १०० टक्के लसीकरण करण्याच्या उद्देशाने या समाजाची जनजागृती करण्यात आली. त्यानंतर या भागात घरोघरी जाऊन लस देण्यात आली आहे.

प्रगती फाऊंडेशन आणि विलू पुनावाला मेमोरिअल हॉस्पिटलचा लसीकरणासाठी पुढाकार

वयोवृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक असे लोक घरातून बाहेर पडू शकत नाहीत. अनेकांमध्ये लसीकरणाविषयी जागृती नाहीये. अशा लोकांसाठी हा उपक्रम असून कात्रजमधील प्रगती फाऊंडेशन आणि विलू पुनावाला मेमोरिअल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी जाऊन लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.

प्रत्येकाला घरी जाऊन लस देणार

ही मोहिम ८ ऑक्टोबर पासून कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात राबविण्यात येत आहे. प्रतिक कदम यांच्या संकल्पनेतून कोरोनावर मात करण्यासाठी परिसर 100 टक्के लसीकरणयुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील प्रत्येक घरी जाऊन लस देण्यात येत आहे.

(unique plan for Deprived person Covid Vaccinationin maharashtra Pune)

हे ही वाचा :

मोठी बातमी! दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची आज टास्कफोर्ससोबत बैठक, दुकानं, लोकलबाबत मोठा निर्णय शक्य

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.