गावच्या कारभाऱ्याला आस्मान दाखवलं, सरपंचकीचा गुलाल उधळला, तेव्हाच शांत बसला!

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विशाल बारवकर या 28 वर्षीय तरुणाची निवड झालीय. | Vishal Barwakar as Sarpanch of Deulgada Gram Panchayat

गावच्या कारभाऱ्याला आस्मान दाखवलं, सरपंचकीचा गुलाल उधळला, तेव्हाच शांत बसला!
निवडणुकीत नामदेव नानांना 229 मतं मिळाली तर विशालने 298 मतं मिळवून राजकारणाच्या आखाड्यात नानांना चितपट केलं आणि 10 तारखेला गावाने विशालला बिनविरोध सरपंच केलं.

दौंड (पुणे) : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विशाल बारवकर या 28 वर्षीय तरुणाची निवड झालीय. गावातील कारभारी माणूस माजी पंचायत समिती सदस्य नामदेव नाना बारवकर यांचं आव्हान विशालसमोर होतं. परंतु गावातील तरुणांशी असलेली नाळ आणि थोरा-मोठ्यांच्या विश्वासाच्या बळावर विशालने नामदेव नानांना आस्मान दाखवून प्रथम ग्रामपंचायत सदस्य आणि आता सरपंचकीचा गुलाल उधळला. (Unopposed elected Vishal Barwakar as Sarpanch of Deulgada Gram Panchayat)

दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा या ग्रामपंयातीकडे सगळ्या तालुक्याचं लक्ष लागून राहिलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं. एका दिग्गज नेत्याला एका नवख्या तरुणाने आव्हान दिलं होतं. नामदेव नानांचा राजकारणातला अनुभव पाहिला तर तो विशालच्या वयाएवढा होता. परंतु ‘गाव करील तो राव काय करील’ अशी जुनी म्हण आहे ती उगीच नाही. गावाने ठरवलं विशालच्या खांद्यावर गुलाल टाकायचा… निवडणुकीत नामदेव नानांना 229 मतं मिळाली तर विशालने 298 मतं मिळवून राजकारणाच्या आखाड्यात नानांना चितपट केलं आणि 10 तारखेला गावाने विशालला बिनविरोध सरपंच केलं.

देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेल विरुद्ध भाजप पुरस्कृत पॅनेल असे दोन एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने 11 पैकी 8 जागा जिंकत भाजप पुरस्कृत पॅनेलला धुळ चारली. निवडून आलेल्या सगळ्याच सदस्यांनी गावच्या विकासासाठी झटण्याचा मानस बोलून दाखवला.

बिनविरोध सरपंच झाल्यावर विशाल आभाळ ठेंगणं झालं होतं. गावाने माझ्यासारख्या एका तरुण पोरावर विश्वास टाकला. त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. गावच्या विकासासाठी मी आता इथून पुढे झटेन. संपूर्ण गावाने माझ्यावर विश्वास टाकून माझ्यावर जबाबदारी दिलीय. त्या जबाबदारीला मी तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी तत्पर राहीन, अशा भावना विशालने बोलून दाखवल्या.

तालुक्यात ही निवडणूक लक्षवेधी का ठरली?

संपूर्ण तालुक्यात देऊळगाव गाडा ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी ठरली तसंच चर्चेला गेली. कारण नामदेव नाना बारवकर हे दौंड तालुक्यातील दिग्गज राजकारणी. पंचायत समिती सदस्य राहिलेल्या नानांची आजूबाजूंच्या गावांवर चांगली पकड आहे तसंच राजकारणात त्यांचं मोठं नाव आहे. आमदार राहुल कुल यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या गावात त्यांच्याच विरोधात 28 वर्षीय विशालने बंड पुकारुन त्यांना पराभवाची धूळ चारली.

संबंधित बातम्या:

VIDEO: कारभारी लयभारी… मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपेक्षा भारदस्त, अहमदनगरमध्ये सरपंचाची हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

(Unopposed elected Vishal Barwakar as Sarpanch of Deulgada Gram Panchayat)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI