UPSC Result 2022 : चहा विक्रेत्याचा मुलगा यूपीएससीत टॉपर, विडा कामगाराचा मुलगा होणार IAS

mangesh khilari success story in UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. राज्यातून पहिला क्रमांक इशिता किशोरने पटकवला आहे. नगर जिल्ह्यातील मंगेश खिल्लारी याला यश मिळाले आहे. त्याच्या वडिलांचे चहाचे दुकान आहे.

UPSC Result 2022 : चहा विक्रेत्याचा मुलगा यूपीएससीत टॉपर, विडा कामगाराचा मुलगा होणार IAS
mangesh khilari success story
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 10:42 AM

संगमनेर : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल (Final Result UPSC) जाहीर करण्यात आला आहे. यूपीएससीत यंदा पहिल्या चारमध्ये मुलीच आहेत. पहिला क्रमांक इशिता किशोरने पटकवला आहे. महाराष्ट्रातील मुलांनाही यंदा मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. यूपीएससीत 396 वा नंबर मिळवलेला मंगेश खिलारी हा अहमदनगर जिल्ह्यातील आहे. त्याचे वडिलांचे चहाचे दुकान आहे तर आई विडी कामगार आहे. असामान्य परिस्थितीत मंगेशने हे यश मिळवले आहे. मंगेशच्या आईला IAS काय असते, हे सुद्धा माहीत नाही, यावरुन त्याचे यश लक्षात येते.

परिस्थिती बेताची

मंगेशचे वडील पाराजी खिलारी चहा विक्री करतात आणि आई विडी कामगार आहे. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथे त्यांचे घर आहे. याच गावात पाराजी खिलारी यांचे छोटसं चहा नाष्ट्याचं दुकान आहे. तर मंगेशची आई विड्या बनवून कुटूंबाला हातभार लावते. घरची परीस्थिती बेताची असतानाही मंगेशने upsc परीक्षेत मोठे यश मिळवले. मंगेशने शालेय शिक्षण अहमदनगरमधून केल्यानंतर पुण्याच्या एसपी कॉलेजमधून बीए केले.

हे सुद्धा वाचा

मंगेशचा मोठा संघर्ष, चहाच्या दुकानात मदत

मंगेशची कथा संघर्षमय आहे. मंगेशच्या आईसाठी हे अगदी सामान्य आहे की तिच्या मुलाने UPSC परीक्षेच्या निकालात 396 रँक मिळवले आहेत कारण तिने या परीक्षेबद्दल कधीही ऐकले नाही. मंगेश म्हणाला की, त्याचे आई-वडील खूप आनंदी आहेत. त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. हे केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठी आणि ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांसाठी हे यश आहे. मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेतून उत्तीर्ण झालेला खिलारी आपल्या वडिलांना अहमदनगर जिल्ह्यातील चहाच्या दुकानात मदत करत होता. मात्र, पदवीचे दिवस संपल्यानंतर ते पुण्यात स्थलांतरित झाले.

शिष्यवृत्तीमुळे मदत झाली

मंगेश म्हणतो म्हणाले, ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेकडून मला शिष्यवृत्ती मिळाली, ही मोठी मदत झाली. तसेच गेल्या वर्षी शिकलेल्या कोचिंग संस्थेत अर्धवेळ शिक्षक म्हणूनही काम केले.

आयआयटी करु शकलो नाही

सुकेवाडी येथील मंगेश खिलारी यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण केली. मंगेश सांगतो की त्याची दोन स्वप्ने होती. प्रथम त्याला आयआयटीमध्ये जायचे होते. तर दुसऱ्याला यूपीएससीची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे होते. आर्थिक अडचणींमुळे आयआयटीमध्ये जाऊ शकलो नाही. त्यामुळेच त्यांनी मोठ्या मेहनतीने UPSC चा मार्ग निवडला. यामध्ये त्याला मित्र आणि शिक्षकांची खूप साथ मिळाली.

घरातून सरकारी नोकरीत कोणी नाही

मंगेश म्हणतो, माझ्या घरातून एकही जण सरकारी नोकरी नाही. तोच सरळ आयएएस होतोय. त्याच्या यशानंतर कुटुंबिय आणि मित्रांनी फटाक्यांची आतीषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला.

हे ही वाचा

UPSC Final Result 2022 : यूपीएससीचा निकाल आला, इशिता किशोर देशात प्रथम, महाराष्ट्रातून कोणाला मिळाले यश

Non Stop LIVE Update
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.