Indian Mangoes : भारतीय आंब्यांची चव चाखणार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन; हापूससह कोणते आंबे? इथे वाचा…

देशातील अग्रगण्य आंबा निर्यातदारांपैकी एक असलेल्या भासला यांनी सांगितले, की त्यांच्या कंपनीने याआधी वैयक्तिक स्तरावर आंबा व्हाईट हाऊसला पाठवला होता आणि त्यांचे उत्पादन पहिल्यांदाच अधिकृत शिष्टमंडळाच्या यूएस भेटीचा भाग असेल.

Indian Mangoes : भारतीय आंब्यांची चव चाखणार अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन; हापूससह कोणते आंबे? इथे वाचा...
आंबा (संग्रहित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 7:30 AM

पुणे : आता भारतीय आंब्यांची चव अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) चाखणार आहेत. जवळपास दोन वर्षांच्या कोविड निर्बंधांनंतर प्रथमच अमेरिकेत फळांची निर्यात सुरू झाली आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी याविषयीची माहिती दिली आहे. गुरुवारी वॉशिंग्टन डीसी (Washington DC) येथे आंबा प्रचार कार्यक्रमात भारतीय आंब्याची एक पेटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कर्मचार्‍यांना सुपूर्द केली जाईल, असे त्यांनी सांगितले. हे आंबे पुण्यातील रेनबो इंटरनॅशनल या निर्यातदाराने मिळवले आणि पॅक केले. या कार्यक्रमाच्या फळांसाठी भारतीय दूतावासाने संपर्क साधल्यानंतर महाराष्ट्रातील केसर, हापूस (Hapus), गोवा मानकूर आणि आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बेंगनपल्ली या पाच वाणांची खरेदी करण्यात आली, असे रेनबो इंटरनॅशनलचे संचालक ए. सी. भासला यांनी सांगितले आहे.

व्हाईट हाऊसला आधीही पाठवला होता आंबा

आंबे पॅक करून सोमवारी हवाई मालवाहतुकीने अमेरिकेला पाठवण्यात आले, असे भासला यांनी सांगितले. ते मंगळवारी दूतावासाच्या अधिकार्‍यांनी स्वीकारले आणि पुन्हा पॅक केले. बॉक्स गुरुवारी राष्ट्रपती बायडेन यांच्या कर्मचार्‍यांकडे सुपूर्द केला जाईल, असे त्यांनी सांगितले. देशातील अग्रगण्य आंबा निर्यातदारांपैकी एक असलेल्या भासला यांनी सांगितले, की त्यांच्या कंपनीने याआधी वैयक्तिक स्तरावर आंबा व्हाईट हाऊसला पाठवला होता आणि त्यांचे उत्पादन पहिल्यांदाच अधिकृत शिष्टमंडळाच्या यूएस भेटीचा भाग असेल.

आंबा लोकप्रिय करण्यासाठी…

भारतीय आंब्याला अमेरिकेत लोकप्रिय करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत नियमितपणे अशा कार्यक्रमांचे आयोजन करतात आणि राजनयिक मंडळातील प्रमुख व्यक्तींना आमंत्रित करतात किंवा त्यांच्याकडे आंब्यासारखे भारतीय उत्पादन पाठवतात. आंब्याच्या हंगामात असे कार्यक्रम बहुतेक देशांमध्ये भारतीय दूतावास किंवा उच्च आयोगाद्वारे आयोजित केले जातात.

हे सुद्धा वाचा

हापूसला जास्त मागणी

सुमारे दोन वर्षांच्या अंतरानंतर, केंद्राने यासाठी युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर (USDA)ची मान्यता मिळविल्यानंतर या वर्षी अमेरिकेत आंब्याची निर्यात पुन्हा सुरू झाली. कोविडमुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर लादलेल्या निर्बंधांमुळे USDA निरीक्षकांना भारतात भेट देता आली नाही, म्हणून 2020मध्ये भारतीय आंब्याच्या निर्यातीवर अमेरिकेने निर्बंध घातले होते. निर्यातदारांना चांगल्या व्यवसायाची आशा असल्याने, त्यांच्यापैकी बहुतेकांनी सांगितले, की यावर्षी अमेरिकन बाजारांनी केसरऐवजी हापूसला जास्त मागणी दर्शविली आहे.

Non Stop LIVE Update
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.