AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवीचे वडील ‘आयसीयू’मध्ये असताना लव्ह मॅरेजचा धक्कादायक निर्णय, मामांनी सांगितले नेमके काय घडले?

Vaishnavi Hagawane Death Case News: वैष्णवीचे वडील आनंद आयसीयूमध्ये दाखल होते. त्या दिवशी ती पळून जाऊन लग्न करण्याच्या तयारीत होती. शेवटी सर्वांना समजवून हे लग्न जुळवून आणले. परंतु सहा महिन्यांत वैष्णवीला तिची चूक समजली, असे वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी सांगितले.

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवीचे वडील 'आयसीयू'मध्ये असताना लव्ह मॅरेजचा धक्कादायक निर्णय, मामांनी सांगितले नेमके काय घडले?
वैष्णवीचे मामा उत्तम बहिरटImage Credit source: TV 9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 22, 2025 | 9:50 AM
Share

Vaishnavi Hagawane Death Case Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सुनेच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शंशाक फरार झाला आहे. दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी बावधन पोलिसांची दोन पथके परराज्यात गेली आहे. दरम्यान, वैष्णवीने लग्नासाठी घरांच्या मंडळींचा विरोध पत्करला. वडील आयसीयूमध्ये असताना पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, असे वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले. अजितदादा या लग्नात होते, आता त्यांनी त्यांच्या बहिणीला न्याय द्यावा, अशी मागणी बहिरट यांनी केली.

असे जमले लग्न

वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी सांगितले की, वैष्णवीच लव्ह मॅरेज आहे. या लग्नाला कुटुंबातील सर्वांचा विरोध होता. परंतु वैष्णवी माझ्याकडे सातत्याने शंशाक सोबत लग्न करायचे आहे, असे सांगत होती. हगवणे कुटुंबाने तिच्यावर काय जादू केला, तिला पूर्ण संमोहीत केले होते, त्यामुळे ती ऐकवण्यास तयार नव्हती. यामुळे त्यांच्या घरात अनेक वेळा वाद झाले. वैष्णवीचे वडील आनंद हे दवाखान्यात आयसीयूमध्ये ऍडमिट होते. त्या वेळी शशांक आणि त्याची बहीण घरी आले. ते वैष्णवीला आताच्या आता आमच्या सोबत चल, मी तुला घेऊन जाणार आहे, असे म्हणाले. त्यावेळी वैष्णवीने माझ्या मुलाला फोन केला. मी शशांक सोबत पळून जाणार आहे, असे सांगितले. मुलाने मला सांगितले.

आम्ही रुग्णालयातून धावत घरी आलो. वैष्णवीला समजवले. तू वेडी आहेस, तुझे वडील आयसीयूमध्ये आहेत आणि तू हा निर्णय घेत आहेस, परंतु ती ऐकवण्यास तयार नव्हती. त्यामुळे मी वैष्णवीच्या कुटुंबियांना समजवून सांगितले. समाजात आपली इज्जत जाईल, असे सांगून लग्न जुळवून आणले. लग्नाची बोलणी करण्यासाठी जी बैठक झाली त्या बैठकीत शंशाककडून फॉर्च्यूनर गाडीचा आग्रह धरला. तसेच सोन्याची मागणी झाली. एक लाख 20 हजाराचे घड्याळ घेतले. सहा महिन्यानंतर जे काही घडू लागले, तेव्हा वैष्णवी मला म्हणत होती, मामा माझी चूक झाली.

आता अजितदादा यांनी न्याय मिळवून द्यावा

वैष्णवी आणि शशांक यांचे लग्न थाटामाटात झाले होते. या शाही लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, राजाभाऊंनी तुमच्याकडे गाडी मागितली की, तुम्ही दिली. आता अजितदादा तुम्ही तुमच्या बहिणीस न्याय द्या, अशी मागणी वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी केली.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा