AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैष्णवी हगवणेचं 9 महिन्यांचं बाळ तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर त्वरित कारवाई

वैष्णवी हगवणेच्या नऊ महिन्यांच्या बाळाला अखेर तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. सासरच्या मंडळींकडून झालेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

वैष्णवी हगवणेचं 9 महिन्यांचं बाळ तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर त्वरित कारवाई
Vaishnavi HagawaneImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 22, 2025 | 12:40 PM
Share

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे आत्महत्येप्रकरणी आता तिचं बाळ तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. “आम्ही सकाळपासून बाळाला शोधत होतो. आम्हाला कॉल आला आणि एका ठिकाणी बाळ देण्यात आलं. मात्र कोणी बाळ दिलं याची माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी दिली. 16 मे रोजी वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर बावधन पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यासह मुलगा शशांक हगवणे आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मुळशीतील भुकूम इथली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर इतके दिवस तिचं बाळ कोणाकडे होतं, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आली नाही.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना याप्रकरणी फोन केला होता. या प्रकरणात इतर कारवाई होत असताना तिचं 9 महिन्यांचं बाळ कुठे आहे, याचा तातडीने शोध घ्या आणि ते तिच्या आईच्या कुटुंबीयांना सुपूर्द करा, अशी विशेष सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांनी दिली होती. त्याचप्रमाणे वैष्णणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे काही व्रण आढळले आहेत. याप्रकरणी बावधन पोलीस अधिक तपास करत आहेत. वैष्णवीचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं तक्रारीत म्हटलंय. तिच्या शवविच्छेदन अहवालात अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. त्यापूर्वीच बावधन पोलिसांनी शशांक हगवणे, लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना बेड्या ठोकल्या आहेत. तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे अद्याप फरार आहेत. वैष्णवीचा मुलगा नऊ महिन्यांचा आहे. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही घटना घडू शकतात, असा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये सीसीटीव्ही तपासण्यात आले असून त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहे.

दरम्यान वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणात दररोज नवीन अपडेट्स समोर येत आहेत. वैष्णवीचं शशांकशी लव्ह मॅरेज झालं होतं, घरच्यांचा विरोध पत्करूनही ती हे लग्न करण्यास तयार होती. कस्पटे कुटुंब ( वैष्णवीचे आई-वडील) यांचा या लग्नाला विरोध होता. मात्र ती या लग्नाच्या निर्णयावर ठाम होती, असं वैष्णवीच्या मामांनी सांगितलं आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी