AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही, कडक कारवाई होणार’, एकनाथ शिंदे काय म्हणाले?

घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून, माणुसकीला काळीमा फासणारी आहे, या प्रकरणात कडक कारवाई केली जाईल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

'वैष्णवी हगवणे प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही, कडक कारवाई होणार', एकनाथ शिंदे काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 24, 2025 | 10:07 PM

पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे, ती म्हणजे वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या छळाला कंटाळून तीने आम्हत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणानं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आज आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कस्पटे कुटुंबाची भेट घेतली आहे. घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी  आहे. पैसे मागत होते, मारहाण करत होते, या सगळ्या घटना घडत होत्या. लोकांची मानसिकता बदलायला हवी, सून म्हणजे मुलगीच असते. अतिशय दुर्दैवी फोटो आहेत. वैष्णवीच्या आई वडिलांची मानसिकता खालावली आहे.

समाज प्रगत झाला आहे, राज्यात अशा घटना घडणे वाईट आहे. अमानवी घटना आहे.  नऊ महिन्याचं बाळ समोर असातना मुलगी असं करू शकत नाही. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, पोलीस काम करत आहेत. घटनेला जबाबदार असणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नये. कुटुंबाची भावना लक्षात घेऊन राज्य सरकार कडक कारवाई करेल, अशा कोणत्याही घटनात राजकारण होता कामा नये, परिस्थिती बदलायला हवी, अशा घटना घडू नये म्हणून कारवाई अपेक्षित आहे, कठोर कारवाई केली जाईल, मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत, उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, यामध्ये कोणीही असेल त्याला गृहविभाग सोडणार नाही, कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आज मोठी कारवाई केली आहे, वैष्णवीचं स्त्रीधन जप्त करण्यात आलं आहे, तसेच तिचा पती आणि तिचा दीर यांच्याकडे असलेलं परवानाधारक पिस्तूल देखील जप्त करण्यात आलं आहे, तसेच तिच्या सासऱ्यानं पळून जाण्यासाठी जी कार वापरली होती ती देखील जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात आज वैष्णीचे दोन्ही भाऊ आणि तिच्या एका मैत्रिणीचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!.
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर
राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर.
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला
युतीच्या चर्चा अन् संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना टोला.
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला
कुणाच्या तिजोरीतील पैसे लुटणार आहात? राऊतांचा अजित पवारांना टोला.
महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा
महिला पायलटचा लैंगिक छळ; धावत्या कॅबमध्ये नको ते घडलं, 3 जणांवर गुन्हा.