निवडणुकीचे वेध, भाजप जाणार पवारांच्या दारी

भारतीय जनता पक्षाला पुन्हा राष्ट्रवादीची गरज पडणार आहे. त्यासाठी भाजपला पवारांच्या दारी जावे लागणार आहे. त्यावेळी पवार कुटुंबिय भाजपला कितपत प्रतिसाद देतात, हे पाहावे लागणार आहे.

निवडणुकीचे वेध, भाजप जाणार पवारांच्या दारी
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यांत कलगीतुरा रंगलाImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 7:43 AM

पुणे : पुणे शहरात भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. पुणे शहरावर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात. आता भारतीय जनता पक्षाला पुन्हा राष्ट्रवादीची गरज पडणार आहे. त्यासाठी भाजपला पवारांच्या दारी जावे लागणार आहे. त्यावेळी पवार कुटुंबिय भाजपला कितपत प्रतिसाद देतात, हे पाहावे लागणार आहे. भाजप यापुर्वी झालेल्या पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची विनंत मान्य केली नव्हती. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांचा विजय झाला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भागीरथ भालके यांचा पराभव केला आहे. आता पुणे शहरातील कसबा पेठ व पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काय निर्णय घेते? यावरच भाजप उमेदवारांचे भविष्य अवलंबून आहे.

राज्यातील एखाद्या पक्षाच्या आमदाराचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाला उमेदवारी दिल्यास ती बिनविरोध करावी, असे संकेत आहे. त्यामुळेच अंधेरीतील पोटनिवडणुकीत उमेदवारी देऊ नये, अशी विनंती शरद पवार यांनी भाजपला केली. यावेळी आपला उमेदवार निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे भाजपने मुरजी पटेल यांना निवडणूक रिंगणातून माघार घेण्यास लावली. पवारांची विनंती आपण मान्य केल्याचे दाखवून दिले. आता पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. तसेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं ही याच महिन्यात निधन झाले आहे.या दोन जागांवर विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

हे सुद्धा वाचा

भाजप घालणार पवारांना साकडे कसबा पेठ व पिंपरी चिंचवड निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यांशी चर्चा करणार आहे. या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार देऊ नये, यासाठी साकडे घालणार आहे. पिंपरी चिंचवडचे दिवंगत आमदार आमदार लक्ष्मण जगताप हे मुळ राष्ट्रवादीचेच नेते होते. २०१४ च्या निवडणुकीत तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र हा मतदारसंघ पारंपारीक राष्ट्रवादीचाच होता. यामुळे पिंपरी चिंचवडच्या जागेसंदर्भात पवार भाजपला कितपत प्रतिसाद देतील, हे पाहावे लागणार आहे. तसेच यापुर्वी भाजपने राष्ट्रवादीची विनंती मान्य केली नव्हती, हा ही मुद्द आहे.

कसबामध्ये काय होणार पुणे शहरातील कसबा मतदार संघावर राष्ट्रवादी दावा करू शकते.पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील या ठिकाणांवरुन निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. कसबा मतदार संघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार जाहीर करणार का? हा प्रश्न आहे. भाजप अंधेरी पोटनिवडणुकीच्या धर्तीवर कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपकडून प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडीत शरद पवार यांचा शब्द अंतिम आहे. यामुळे राष्ट्रवादीने ठरवल्यास या निवडणुका बिनविरोध होणार. परंतु राष्ट्रवादी पंढरपूरच्या पराभवाचा वचपा काढणार असल्याचं चर्चा सुरु आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.