इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, जबरदस्ती नाही : विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडीने सरकारने दिलेल्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचं (EWS) समर्थन केलं आहे.

इच्छा असेल तर EWS चे आरक्षण घ्या, जबरदस्ती नाही : विजय वडेट्टीवार
चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांधावर
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 8:08 PM

पुणे : महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकासआघाडीने सरकारने दिलेल्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचं (EWS) समर्थन केलं आहे. तसेच ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर परिणाम होणार नसल्याचंही स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाचं (EWS) हे ऐच्छित असून कुणावरही त्याची जबरदस्ती नाही. इच्छा असेल त्याने या आरक्षणाचा लाभ घ्यावा, असंही मत व्यक्त केलं. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते (Vijay Wadettiwar comment on SEBC Reservation EWS reservation and Maratha Community).

विजय वडेट्टीवार म्हणाले, “ESW चे आरक्षण हे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आहे. हे आरक्षण ऐच्छिक आहे. इच्छा असेल तर आरक्षण घ्या, या आरक्षणाची जबरदस्ती नाही. या आरक्षणाचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे. त्याचा सुनावणीवर परिणाम होणार नाही. मागील सरकारने SEBC मधून आरक्षण दिलं त्यावेळी ओबीसीला धक्का लावणार असं म्हटलं होतं. सराटे यांनी त्यानंतर याचिका दाखल केली.”

“मंडल आयोगाने आम्हाला ओबीसी ठरवलं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनीही ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार असं म्हटलं आहे. ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश होणारच नाही. मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये काहीही अडचणी येणार नाही. EWS आरक्षण ऐच्छिक आहे,” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

“सर्वोच्च न्यायालय कुणाच्या इशाऱ्यावर चालतं का? हा प्रश्न उभा राहतो”

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी महराष्ट्रावर अन्याय होत असल्याचं म्हणत न्यायालय ते म्हणाले, “मला कळत नाही महाराष्ट्रावरच अन्याय का होतो? सर्वोच्च न्यायालयाचा आदर आहेच. पण असं होत असेल तर न्यायालय कुणाच्या इशाऱ्यावर चालतं का? हा प्रश्न उभा राहतो. मराठा आरक्षणाला स्थगिती का मिळते हे कळत नाही. परीक्षा आणि इतर मुद्द्यांवरील निकालाबाबत महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल.”

हेही वाचा :

Maratha reservation |..मग मराठा विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणार का?, वडेट्टीवारांचा सवाल

लोकल सुरु व्हावी ही मुख्यमंत्र्यांची इच्छा, येत्या दहा दिवसात निर्णय, वडेट्टीवारांची घोषणा

विदर्भच काँग्रेसला दिशा देईल, थोरातांच्या उपस्थितीत वडेट्टीवारांचं वक्तव्य

Vijay Wadettiwar comment on SEBC Reservation EWS reservation and Maratha Community

Non Stop LIVE Update
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.