पुणेकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ भागांमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद

पंपिग स्टेशनच्या दुरुस्तीच्या कामानंतरही शुक्रवारी संबंधित भागांमध्ये कमी दाबानेच पाण्याचा पुरवठा होईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. | Water Cut in Pune

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:16 AM, 3 Mar 2021
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; 'या' भागांमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद
पुणे महानगरपालिकेकडून लष्कर जलकेंद्र आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशनच्या भागात दुरुस्तीची काम करण्यात येणार आहे.

पुणे: पुणे शहराच्या अनेक भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद (Water Cut) राहणार आहे. पालिका प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने पाणीपुरवठा दिवसभर बंद राहील, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे उद्या पुणेकरांना (Pune) पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून लष्कर जलकेंद्र आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशनच्या भागात दुरुस्तीची काम करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Major Water cut in Pune city)

कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा बंद राहणार?

लष्कर भाग, पुणे स्टेशन, कोरेगाव पार्क,मुंढवा, येरवडा, विश्नांतवाडी,वडगाव शेरी, कल्याणी नगर,चंदननगर, खराडी,कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, नवीन होळकर आणि चिखली विभाग,विद्यानगर, कळस धानोरी, टिंगरे नगर, लोहगाव, विश्नांतवाडी,विमाननगर , विश्नांतवाडी

दुरुस्तीनंतरही कमी दाबाने पाणीपुरवठा

पंपिग स्टेशनच्या दुरुस्तीच्या कामानंतरही शुक्रवारी संबंधित भागांमध्ये कमी दाबानेच पाण्याचा पुरवठा होईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुण्यात कोरोना वाढला; 42 कंटेन्मेंट झोन, ‘हा’ भाग ठरतोय हॉटस्पॉट

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांचा (Coronavirus) आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे आता महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी पुण्यातील (Pune) 10 क्षेत्रीय कार्यालयांच्या विभागात 42 कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये हडपसर परिसरात सर्वाधिक पाच कंटेन्मेंट झोन आहेत. त्यामुळे हडपसर परिसर सध्या पुण्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताना दिसतोय. पुणे महानगरपालिकेकडून यासंदर्भात अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोठ्या इमारतींमध्ये रुग्ण सापडल्यास ती संपूर्ण इमारत सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Coronavirus patient increases in Pune)

गेल्यावर्षी राज्यात कोरोनाची साथ आली तेव्हा पुणे हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. सुरुवातीच्या काळात पुण्यात कोरोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.

(Major Water cut in Pune city)