पुणेकरांसाठी खुशखबर, दमदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

Rain in Pune | धरण साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणात मिळून सध्या 11.3 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी धरणात 9.47 टीएमसी पाणीसाठा होता.

पुणेकरांसाठी खुशखबर, दमदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ
खडकवासला धरण
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 2:24 PM

पुणे: जून महिन्यातील उत्तरार्ध आणि जुलैच्या पूर्वाधात दडी मारलेल्या पावसाने राज्यभरात दमदार पुनरागमन केले आहे. पुण्याच्या खडकवासला धरण साखळीत यावर्षी हंगामातील सर्वाधिक पाऊस (Rain) पडला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे चारही धरणांमधील पाणीसाठ्यात दोन टीएमसीने वाढ झाली आहे.

धरण साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणात मिळून सध्या 11.3 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी धरणात 9.47 टीएमसी पाणीसाठा होता.

तर पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात याठिकाणी 60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 1 जूनपासून या परिसरात तब्बल 798 मिमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात पवना धरणक्षेत्रात 484 मिमी पाऊस झाला होता. सध्या पवना धरण 40.44% टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात 2.59 टक्के तर 1 जूनपासून पाणीसाठ्यात 8.85 टक्के इतकी वाढ झाली आहे.

मुंबईतील तलावक्षेत्रातही मुसळधार पाऊस

डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार असलेल्या मुंबईकरांनाही नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 1 लाख 28 हजार दशलक्ष लिटरने वाढला आहे.

तलाव पाणीसाठा दशलक्ष लिटरमध्ये

मोडकसागर – 66,092 तानसा- 78,467 मध्य वैतरणा- 37,551 भातसा- 1,97,321 तुळशी- 8,046 विहार- 27,698

बंधित बातम्या : 

MNS Disaster Management Squad | मनसेचे 50 प्रशिक्षित कार्यकर्ते, पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन पथकाची वैशिष्ट्यं काय?

Raigad Rain | रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर, 5 जण बेपत्ता, शोध मोहीम सुरु

पावसामुळे ओढ्याला पूर, नवी मुंबईजवळ धबधब्यावर अडकलेल्या 116 पर्यटकांची सुटका

(Water level of dams increases in Pune due to heavy rain)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.