पुणेकरांनो पाणी जपून वापरा, ‘या’ दिवशी पाणी पुरवठा बंद, महापालिकेकडून सूचना जारी

पुणेकरांनो पाणी जपून वापरा, 'या' दिवशी पाणी पुरवठा बंद, महापालिकेकडून सूचना जारी
tap water-supply

पुणेकरांनो पाणी जपून वापरा अन्यथा या आठवड्यात तुमच्यावर पाणी संकट ओढावू शकतं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 29, 2021 | 3:41 PM

पुणे : पुणेकरांनो पाणी जपून वापरा अन्यथा या आठवड्यात तुमच्यावर पाणी संकट ओढावू शकतं. पुणे शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर या जलकेंद्रांमध्ये काही दुरुस्ती कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (1 जुलै) बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (2 जुलै रोजी) उशिरा आणि कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे (Water supply of Pune will be stop due to repairing work PMC inform).

पाणीपुरवठा बंद असणारा परिसर

पर्वती जलकेंद्र भाग : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकूंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डडाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिन्नरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वरीनगर, साईबाबा नगर, सर्व्हे नंबर 42. 46, कोंढवा खुर्द, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

वडगाव जलकेंद्र परिसर: हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसर पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड.

नवीन होळकर पंपिंग परिसर

विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, नगर रोड,लोहगाव, मुळा रोड

लष्कर जलकेंद्र परिसर

लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, नगररस्ता, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी

भामा असखेड जलशुद्धीकरण केंद्र परिसर

विश्रांतवाडी, वडगाव शेरी, येरवडा, विश्रांतवाडी, विमाननगर, कल्याणीनगर, फुलेनगर, या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी कमीदाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

हेही वाचा :

‘ही’ गोष्ट पुणेकर नेहमी लक्षात ठेवतील, महापौरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

पावसाळी सहल महागात, पुण्यात कांचन धबधब्यावर गर्दी, पर्यटकांकडून दंडवसुली

कोरोना लस न घेतल्यास वेतन स्थगिती? पिंपरी चिंचवड महापालिकेचा कर्मचाऱ्यांना इशारा

व्हिडीओ पाहा :

Water supply of Pune will be stop due to repairing work PMC inform

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें